दाक्षिणात्य सुपरस्टार Rajinikanth यांच्या बहुप्रतीक्षित Jailer 2 चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मोठी दुर्घटना घडली आहे. चित्रपटाच्या सेटवर काम करणाऱ्या एका क्रू मेंबरचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली असून, संपूर्ण चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, Chennai येथील एका खासगी स्टुडिओमध्ये ‘जेलर 2’चे शूटिंग सुरू होते. यावेळी आर्ट डिपार्टमेंटमध्ये काम करणारे कार्तिकेयन नावाचे कर्मचारी घरासारखा सेट उभारण्याचे काम करत होते. सेट तयार करण्याच्या प्रक्रियेदरम्यान अचानक विजेचा प्रवाह सुरू झाल्याने त्यांना जोरदार करंट बसला.
घटनास्थळी उपस्थित सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे चित्रपटाच्या सेटवर शोककळा पसरली आहे.
पोलिसांकडून चौकशी सुरू
स्थानिक पोलिसांनी या घटनेची प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. सेटवर नेमका विजेचा लीक कसा झाला, तसेच सुरक्षेच्या उपाययोजनांमध्ये कोणतीही हलगर्जीपणा झाला होता का, याचा तपास केला जात आहे. अद्याप या प्रकरणात अधिकृत एफआयआर दाखल करण्यात आलेला नसला तरी तांत्रिक बाबींची तपासणी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या निर्मात्यांकडून किंवा टीमकडून याबाबत अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
‘जेलर 2’बाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता
Nelson Dilipkumar दिग्दर्शित हा चित्रपट 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट Jailerचा सिक्वेल आहे. पहिल्या भागाने बॉक्स ऑफिसवर मोठे यश मिळवत जगभरात 600 कोटी रुपयांहून अधिक कमाई केली होती.
‘जेलर 2’मध्ये Rajinikanth पुन्हा एकदा ‘टायगर’ मुथुवेल पांडियनच्या भूमिकेत दिसणार आहेत. तसेच Ramya Krishnan, Shiva Rajkumar, Mohanlal आणि Mithun Chakraborty यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आणि कॅमिओ चित्रपटात पाहायला मिळणार असल्याची चर्चा आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासून चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, रिलीजपूर्वीच घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण टीमवर शोककळा पसरली आहे.
Users Today : 27