लातूरमध्ये रस्त्याकडेला सापडली दागिन्यांनी भरलेली संशयास्पद बॅग; पोलिसांकडे जमा

KHOZ MASTER
1 Min Read

लातूर :

लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुशीलादेवी कॉलेजच्या पाठीमागील गेट परिसरात रस्त्याच्या कडेला संशयास्पद स्थितीत एक काळ्या रंगाची बॅग आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. ही घटना शुक्रवार (दि. १६ मे २०२६) रोजी रात्री ११ ते ११.४० वाजण्याच्या दरम्यान घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, विवेकानंद चौक पोलीस ठाण्यातील API खोडेवाड व त्यांचे मित्र अरुण हे परिसरातून जात असताना रस्त्याच्या कडेला पडलेली बॅग त्यांच्या निदर्शनास आली. संशय आल्याने त्यांनी वाहन थांबवून बॅगची पाहणी केली असता त्यामध्ये लहान मुलांचे कपडे, पॅम्पर्स तसेच इतर साहित्य आढळून आले.

दरम्यान, बॅगेत अंदाजे ६ ते ७ तोळे सोन्याचे दागिने तसेच सुमारे १ तोळा चांदीचे दागिने मिळून आले. या दागिन्यांची किंमत अंदाजे १० लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे.

प्रथमदर्शनी ही बॅग मोटारसायकलवरून प्रवास करताना गहाळ झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित बॅग किंवा दागिने हरवल्याबाबत कोणाची तक्रार प्राप्त झाल्यास योग्य खातरजमा करून बॅग परत करण्यात येईल, अशी माहिती विवेकानंद चौक पोलीस ठाण्याचे API खोडेवाड यांनी दिली.

या घटनेनंतर पोलिसांनी बॅग ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून नागरिकांनी मौल्यवान वस्तूंची वाहतूक करताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

0 9 7 2 7 5
Users Today : 38
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *