दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान ६ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचे आरोप

KHOZ MASTER
1 Min Read

पुणे

पुण्यातील एरंडवणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे डोळ्याच्या शस्त्रक्रियेदरम्यान सहा वर्षीय प्रियांशी जितेंद्र बागडे (वय ६) या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांवर गंभीर हलगर्जीपणाचे आरोप केले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियांशीला तिरळेपणा आणि ग्लॉकोमा संबंधित त्रासासाठी उपचार सुरू होते. शस्त्रक्रियेसाठी तिला ऑपरेशन थिएटरमध्ये नेण्यात आले तेव्हा ती पूर्णपणे ठणठणीत असल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. मात्र काही मिनिटांतच तिची प्रकृती गंभीर झाल्याचे सांगण्यात आले आणि CPR करूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे रुग्णालयाकडून कळवण्यात आले.

मुलीचे वडील जितेंद्र बागडे यांनी डॉक्टरांनी चुकीची किंवा अतिप्रमाणात भूल दिल्याचा आरोप करत उपचार प्रक्रियेत निष्काळजीपणा झाल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शवविच्छेदन अहवाल आणि वैद्यकीय समितीच्या निष्कर्षानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

या घटनेनंतर पुण्यात वैद्यकीय जबाबदारी, रुग्ण सुरक्षा आणि शस्त्रक्रिया प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *