बुलढाणा
बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील दिव्य सेवा प्रकल्प आश्रम, वरवंड येथे वास्तव्यास असलेल्या एका अनोळखी इसमाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मृत व्यक्ती अंदाजे ५० वर्षीय पुरुष असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
दिव्य सेवा प्रकल्प आश्रमाचे संचालक अशोक काकडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्ती अनोळखी व बेवारस असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचा पत्ता दिव्य फाऊंडेशन, वरवंड, ता. जि. बुलढाणा असा नमूद करण्यात आला आहे.
या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये मर्ग क्रमांक २५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. कक्षसेवक यांच्या अहवालावरून ही कारवाई करण्यात आली आहे.
मृत व्यक्तीची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांचा शोध घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. संबंधित व्यक्तीबाबत कोणास काही माहिती असल्यास तपासी अधिकारी पोहेकॉ कैलास उगले यांच्याशी ८८८८८११७१४ किंवा ८८३०२६५२१४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Users Today : 52