विशेष प्रतिनिधी :
संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण ठरलेल्या #MissionVandeMataram अंतर्गत Border Security Force च्या सर्व-महिला माउंट एव्हरेस्ट मोहिम पथकाने जगातील सर्वोच्च शिखर Mount Everest यशस्वीरीत्या सर करून इतिहास रचला आहे.
या अभूतपूर्व कामगिरीमुळे देशभरातून महिला जवानांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या शौर्य, जिद्द आणि देशसेवेच्या भावनेचे सर्व स्तरांतून कौतुक केले जात आहे. अत्यंत प्रतिकूल हवामान, कठीण भौगोलिक परिस्थिती आणि अनेक आव्हानांचा सामना करत जवानांनी ही मोहीम यशस्वी करून भारतीय महिला शक्तीची ताकद जगासमोर अधोरेखित केली आहे.
या मोहिमेतील महिला जवानांनी दाखवलेले अतुलनीय धैर्य, अढळ समर्पण आणि अदम्य देशभक्तीची भावना ही भारतीय सुरक्षादलांचा खरा आत्मा दर्शवणारी असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या या यशामुळे देशातील लाखो मुलींना प्रेरणा मिळणार असून, महिलांच्या सामर्थ्याचा नवा आदर्श निर्माण झाला आहे.
Border Security Force च्या गौरवशाली #नारीशक्तीला देशभरातून मानाचा सलाम करण्यात येत आहे.
Users Today : 44