भारताच्या अवकाश संशोधन क्षेत्रासाठी अभिमानाची बाब ठरलेल्या Indian Space Research Organisation आणि चंद्रयान-3 मोहिमेच्या टीमला अमेरिकेतील प्रतिष्ठित American Institute of Aeronautics and Astronautics तर्फे 2026 चा मानाचा ‘Goddard Astronautics Award’ जाहीर झाला आहे.
चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग करून इतिहास रचणाऱ्या Chandrayaan-3 मोहिमेच्या या ऐतिहासिक यशाला आता जागतिक स्तरावरही मोठा गौरव मिळाला आहे. भारताच्या वैज्ञानिक प्रगतीचे, संशोधन क्षमतेचे आणि नवोपक्रमातील नेतृत्वाचे हे दैदिप्यमान प्रतीक असल्याचे मानले जात आहे.
अत्यंत कमी खर्चात आणि उच्च तांत्रिक कौशल्याच्या बळावर भारताने चंद्र मोहिमेत मिळवलेले यश संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरले आहे. विशेषतः चंद्राच्या दक्षिण ध्रुवीय भागात यशस्वी लँडिंग करणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला होता.
देशभरातून इस्रोच्या वैज्ञानिकांवर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, या यशामागे वैज्ञानिकांचे अथक परिश्रम, संशोधनातील सातत्य आणि राष्ट्रासाठीची समर्पित भावना असल्याचे गौरवोद्गार काढले जात आहेत.
Narendra Modi यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वाखाली भारताचा अवकाश प्रवास जागतिक स्तरावर नवनवीन यशाची शिखरे गाठत असल्याची भावना विविध स्तरांतून व्यक्त करण्यात येत आहे.
Users Today : 44