आजाराची परवा न करता शेतकरी हितासाठी आमदार सिद्धार्थ खरात पोहचले धरणावर!!

KHOZ MASTER
2 Min Read

शेतकऱ्यांची हाक ऐकताच आजारी अवस्थेतही धरणावर धाव

आमदार सिद्धार्थ खरातांचा जलसुरक्षेसाठी पुढाकार

मेहकर तालुक्यातील कळपिरा धरणाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धरणाला पडलेल्या मोठमोठ्या भगदाडांमुळे परिसरातील हजारो एकर शेती धोक्यात आल्याची भीती व्यक्त होत आहे. १९७८ साली बांधण्यात आलेले हे जुने धरण आजपर्यंत मोठ्या दुरुस्तीपासून वंचित राहिले असून, यावर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर त्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

धरणाच्या पाठीमागील पिचिंग भागात सायाळ पक्ष्याने अक्षरशः २०० ते ३०० फूटांपर्यंत मोठमोठी बिळे व छिद्रे निर्माण केली आहेत. या असंख्य भगदाडांमुळे पाण्याचा दबाव वाढल्यास धरण फुटण्याचा धोका निर्माण झाला असून, धरणाखालील हजारो एकर शेती, गावांचा संपर्क आणि नागरिकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

गावकऱ्यांच्या आणि सरपंचांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आमदार सिद्धार्थ खरात यांनी तातडीने जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता व संबंधित अधिकाऱ्यांना थेट घटनास्थळी आणून धरणाची पाहणी केली. पाहणीदरम्यान धरणावरील धोकादायक स्थिती अधिकाऱ्यांना दाखवून देत तातडीने भगदाडे बुजवण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या संदर्भात संबंधित विभागाकडे निधीची तरतूद नसल्याचे समोर आले असून, आवश्यक निधी उपलब्ध करून संपूर्ण धरणाची मजबुतीकरणासह दुरुस्ती करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. याचबरोबर मतदारसंघातील कणक्याचे धरण, देऊळगाव परिसरातील पाझर तलाव आणि जिल्हा परिषद व जलसंधारण विभागाच्या अखत्यारीतील इतर धरणांच्या दुरुस्तीचे प्रस्तावही शासनाकडे पाठविण्याबाबत चर्चा करण्यात आली.

यावेळी आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले, मी स्वतः शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे शेतकऱ्यांचा आवाज माझ्यासाठी शासनाच्या कोणत्याही आदेशापेक्षा मोठा आहे. शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला तर मी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्या पाठीशी उभा राहणार.

विशेष म्हणजे, सततच्या दौऱ्यांमुळे व उन्हामुळे तब्येत बिघडूनही उपचार घेतल्यानंतर आमदार खरात पुन्हा थेट शेतकऱ्यांच्या सेवेसाठी मैदानात उतरल्याने ग्रामस्थांनी त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.

यावेळी संबंधित विभागाचे अधिकारी दिलीप निपाने, प्रादेशिक जलसंधारण अधिकारी, मृद व जलसंधारण विभाग अमरावती येथील अधिकारी उपस्थित होते. तसेच सरपंच सुनील तांगडे, शेतकरी सुभाष तांगडे, प्रफुल्ल तांगडे, प्रमोद तांगडे, धनंजय तांगडे, राजू श्रीधर तांगडे, विलास तांगडे, समाधान सरदार आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

0 9 7 5 1 8
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *