अकोला :
देशसेवेची भावना कृतीतून जपणारे आणि समाजासमोर प्रेरणादायी आदर्श निर्माण करणारे पाध्ये एज्युकेशनचे संचालक मुकुंद पाध्ये सर यांनी भारतीय लष्कराच्या केंद्रीय सैनिक कल्याण निधीसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची देणगी देत देशभक्तीचा अनोखा संदेश दिला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय योगदानाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.
भारतीय सैनिक देशाच्या सीमांवर जीवाची पर्वा न करता राष्ट्ररक्षणाचे कर्तव्य बजावत असताना, समाजातील जबाबदार नागरिकांनीही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक असल्याची भावना मुकुंद पाध्ये सर यांनी आपल्या कृतीतून अधोरेखित केली आहे.
विशेष म्हणजे, देशासाठी योगदान देण्याची त्यांची ही भावना नवीन नाही. १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धाच्या काळातही त्यांनी भारतीय सैनिकांच्या मदतीसाठी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली होती. त्या काळातील त्यांचे योगदानही समाजात विशेष चर्चेचा विषय ठरले होते.
सैनिक कल्याणासाठी दिलेल्या या मोठ्या देणगीमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार असून, समाजातील सक्षम घटकांनीही राष्ट्रसेवेसाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या कृतीतून दिला जात आहे.
मुकुंद पाध्ये सर यांच्या या योगदानामुळे अकोला जिल्ह्याचे नावही अभिमानाने उंचावले असून, विविध सामाजिक, शैक्षणिक आणि नागरिक स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Users Today : 0