सोशल मीडियावर व्हायरल EPS-95 पेन्शन मंजुरीचे पत्र बनावट; अधिकृत घोषणा नसल्याचे स्पष्ट

KHOZ MASTER
1 Min Read

सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असलेल्या EPS-95 पेन्शनधारकांना साडेसात हजार रुपये पेन्शन मंजूर झाल्याच्या दाव्याबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. संबंधित पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

#FactCheck अंतर्गत करण्यात आलेल्या पडताळणीत कामगार मंत्रालयाकडून यासंदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसल्याचे समोर आले आहे. तसेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) कडूनही सोशल मीडियावर फिरणारे पत्र फेक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांनी अशा अप्रमाणित संदेशांवर विश्वास ठेवू नये, तसेच कोणतीही माहिती अधिकृत सरकारी संकेतस्थळ किंवा अधिकृत माध्यमांतूनच तपासून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर दिशाभूल करणाऱ्या पोस्ट आणि बनावट पत्रांच्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

0 9 7 5 7 0
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *