सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये भक्ती खानझोड व आर्यन पुंडेंना सुवर्ण व कांस्यपदक ## माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी

KHOZ MASTER
2 Min Read

शेगाव : भोपाल (मध्यप्रदेश) येथे नुकत्याच पार पडलेल्या १९ व्या सीनियर नॅशनल डॉजबॉल चॅम्पियनशिपमध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्ण व कांस्यपदकावर आपली मोहर उमटवली आहे.

डॉजबॉल फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने १८ ते २१ मे दरम्यान भोपाल येथे या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरातील नामांकित संघांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने सुरुवातीपासूनच दमदार खेळाचे प्रदर्शन केले.

महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने तसेच मिक्स टूर्नामेंट प्रकारात उत्कृष्ट समन्वय आणि कौशल्य दाखवत मध्यप्रदेश, कर्नाटक, बिहार, तामिळनाडू आणि छत्तीसगड यांसारख्या बलाढ्य संघांवर मात केली. अटीतटीच्या सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघाने शानदार विजय मिळवत प्रथम क्रमांक पटकावून सुवर्णपदक जिंकले.

त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या मुलांच्या संघानेही प्रभावी खेळ करत राष्ट्रीय स्पर्धेत तिसरे स्थान मिळवून कांस्यपदकावर नाव कोरले.

या विजयी संघांमध्ये माऊली स्कूल ऑफ स्कॉलर्सचे खेळाडू भक्ती ज्ञानेश्वर खानझोड आणि आर्यन नितेश पुंडे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांच्या उत्कृष्ट मैदानी कौशल्याचे आणि अष्टपैलू कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

“संस्थेचा प्रत्येक विद्यार्थी केवळ अभ्यासातच नव्हे, तर क्रीडा क्षेत्रातही राष्ट्रीय पातळीवर चमकला पाहिजे, हेच आमचे स्वप्न आहे,” असे मत संस्थापक ज्ञानेश्वरदादा पाटील यांनी व्यक्त केले.

विद्यार्थ्यांच्या या ऐतिहासिक यशानंतर शाळेचे संस्थापक ज्ञानेश्वरदादा पाटील आणि मुख्याध्यापिका मृणालीताई पाटील यांनी विजेत्या खेळाडूंचे विशेष अभिनंदन केले. तसेच या यशामागे शाळेचे क्रीडा प्रमुख विश्वजीत ठाकूर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभल्याचेही नमूद करण्यात आले.

0 9 7 6 0 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *