जय महाराष्ट्र ढाब्यावर पोलिसांचा छापा ## २३ हजारांहून अधिक किमतीची देशी-विदेशी दारू जप्त

KHOZ MASTER
1 Min Read

जलंब :* जलंब पोलिसांनी माटरगाव येथील जय महाराष्ट्र ढाब्यावर छापा टाकून २३ हजार ५७५ रुपयांची देशी व विदेशी दारू जप्त केली. ही कारवाई २३ मे रोजी सायंकाळी ८.३० वाजताच्या सुमारास करण्यात आली.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जलंब पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या माटरगाव येथील मच्छिंद्रखेड चौफुलीजवळ असलेल्या जय महाराष्ट्र ढाब्यावर पोलिसांनी छापा टाकला. यावेळी ढाब्यातून विविध प्रकारची देशी व विदेशी मद्याची साठवणूक आढळून आली.

कारवाईदरम्यान पोलिसांनी रॉयल चॅलेंजर बियर ३७ नग, टुबॉर्ग बियर ६ नग, मॅकडॉवेल नंबर वन १० नग, रॉयल चॅलेंजर्स १० नग, रॉयल व्हिस्की ५ नग, रॉयल व्हिस्की नाईंटी ३ नग, व्हाईट व्हिस्की १४ नग, तसेच देशी दारू टॅगो पंच ४० नग आणि बॉबी संत्रा १२५ नग असा एकूण २३ हजार ५७५ रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.

या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल जावेद रमजान नौरंगावादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी संतोष मच्छिंद्रनाथ कळमकार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास ठाणेदार अमोल सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जावेद रमजान नौरंगावादी करीत आहेत.

0 9 7 6 0 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *