अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी आरोपींना अटक करण्याची मागणी निष्पक्ष तपास न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा

KHOZ MASTER
1 Min Read

लोणार : तालुक्यातील चिखला येथील संतोष काकडे यांनी त्यांच्या अल्पवयीन मुलीच्या आत्महत्येप्रकरणी संबंधित आरोपींना तात्काळ अटक करून निष्पक्ष तपास करण्यात यावा, अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास लोकशाही मार्गाने आमरण उपोषण करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

निवेदनानुसार, संतोष काकडे यांची १५ वर्षीय मुलगी तनुजा हिने आरोपी ज्ञानेश्वर बुधवत व त्यांची पत्नी स्वाती यांच्या मानसिक त्रास, शोषण आणि कथित अत्याचाराला कंटाळून १४ एप्रिल २०२६ रोजी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आत्महत्येपूर्वी लिहून ठेवलेल्या सुसाईड नोटमध्ये संबंधित आरोपींची नावे स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचा दावा कुटुंबीयांनी केला आहे. या प्रकरणी बीबी पोलीस स्टेशनमध्ये १७ एप्रिल २०२६ रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र अद्याप आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

यामुळे पीडित कुटुंब भयभीत आणि असुरक्षित वातावरणात जीवन जगत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. संबंधित आरोपींना तात्काळ अटक करणे, निष्पक्ष तपास करणे, पीडित कुटुंबाला पोलीस संरक्षण देणे तसेच तपासावर कोणताही राजकीय दबाव येऊ न देण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

योग्य कारवाई न झाल्यास न्याय मिळवण्यासाठी आमरण उपोषण करण्याचा इशारा संतोष काकडे यांनी प्रशासनाला दिला आहे.

0 9 7 6 0 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *