जीवघेण्या भेगा बुजविण्यासाठी शिवसेना स्टाईल आंदोलन!!

KHOZ MASTER
3 Min Read

अमोल म्हस्के पाटील यांच्या नेतृत्वात आंदोलन, अधिकाऱ्यांनी घेतली तात्काळ दखल

शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के यांनी दिला तीव्र स्वरूपाचा इशारा!

गुरुवारपर्यंत भेगा न बुजविल्यास शिवसेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन

मेहकर
मेहकर ते हिवरा आश्रम रस्त्याच्या दरम्यान मुख्य रस्त्यावर मोठमोठ्या जीवघेण्या भेगा पडल्या आहेत गेल्या अनेक वर्षापासून या भेगा आहेत मात्र संबंधित अधिकारी किंवा कंत्राटदाराने यांनी भेगा बुजविल्या नाहीत या भेगामुळे दुचाकीचा अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना अपंगत्व सुद्धा आलेले आहे अशा परिस्थितीत शिवसेनेचे अमोल पाटील म्हस्के यांनी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून भेगा संदर्भात माहिती दिली होती मात्र संबंधित अधिकाऱ्याकडून उडवा उडवीची उत्तरे मिळत होती मात्र रोज अपघात होत आहेत अखेर जनतेच्या हितासाठी अमोल पाटील म्हस्के व इतर सहकाऱ्यांनी कोणतीही पर्वा न करता 25 मे रोजी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नागझरी बुद्रुक गावाजवळ मुख्य रस्त्यात पडलेल्या भेगांमध्ये बसून अर्धनग्न आंदोलन सुरू केले या संदर्भात या आंदोलनाला अनेकांनी आपला पाठिंबा दर्शविला जनहितासाठी आंदोलन असल्याने व संबंधित विभागाचे अधिकारी माहीत असूनही दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र स्वरूपाचा रोष दिसून आला अशा परिस्थितीत अमोल म्हस्के पाटील यांनी संबंधित विभागाचे अधिकारी चव्हाण साहेब यांच्याशी फोनद्वारे आंदोलन सुरू असताना संपर्क साधला व परिस्थिती सांगितली जर भेगा बुजवल्या नाही तर आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही अशी ठाम भूमिका घेतली यावेळी संबंधित अधिकारी चव्हाण साहेब यांनी अमोल म्हस्के पाटील यांची समजूत घातली व मला दोन-तीन दिवस वेळ द्या मी शंभर टक्के गुरुवारपर्यंत भेगा बुजवतो असे सांगितले त्यानंतर अमोल पाटील म्हस्के यांनी चव्हाण साहेब यांच्याशी बोलत असताना जर गुरुवारपर्यंत भेगा बुजविल्या नाही तर आम्ही शुक्रवारी किंवा कोणत्याही दिवशी कोणतीही पूर्व सूचना न देता आतापर्यंत भरपूर सूचना दिल्या असल्यामुळे यापुढे कोणतेही सूचना न देता हजारोच्या संख्येने मुलं बाळ घेऊन महिला पुरुष घेऊन वयस्कर मंडळी घेऊन या मुख्य रस्त्यावर आंदोलन करू व याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अधिकारी व संबंधित कंत्राटदारावर राहील असे सांगितले चव्हाण साहेब यांनी अमोल म्हस्के पाटील यांची समजूत काढत मला दोन-तीन दिवस वेळ द्या मी शंभर टक्के भेगा बुजवून देतो असे म्हटले त्यामुळे अमोल पाटील म्हस्के यांनी समजूतदारपणा घेऊन आपले आंदोलन काही दिवसापुरते स्थगित केले आहे व गुरुवारपर्यंत जर भेगा बुजवल्या नाही तर अमोल पाटील म्हस्के हे पुन्हा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहेत यावेळी अमोल म्हस्के पाटील, छगन नाना, सचिन काटे, विनोद आखरे,अनिल कांबळे, विजय चव्हाण, सचिन , सरकटे नवघरे,गजानन देवकर, प्रशांत मगर,बाळू काळे आदी उपस्थित होते यावेळी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख मायाताई म्हस्के योगायोगाने त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्यांनी सुद्धा सांगितले की एवढ्या मोठ्या भेगा पडल्या असताना संबंधित अधिकारी व कंत्राटदार दुर्लक्ष करीत आहे ही चांगली बाब नाही त्यामुळे जर लवकरात लवकर ह्या भेगा बुजविल्या नाही तर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने सुद्धा भविष्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी मायाताई म्हस्के यांनी दिला

0 9 7 6 4 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *