ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांच्या मेहकर तालुक्यात भेटीगाठी

KHOZ MASTER
2 Min Read

नागेशवाडी येथे डायरियाग्रस्त रुग्णांची विचारपूस; शुद्ध पाणीपुरवठ्याची मागणी

मेहकर :

ॲड. शर्वरी रविकांत तुपकर यांनी मेहकर तालुक्यात विविध ठिकाणी भेटीगाठी देत नागरिक, कार्यकर्ते व सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींशी संवाद साधला. नागेशवाडी येथे दूषित पाण्यामुळे डायरियाग्रस्त झालेल्या रुग्णांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.

यावेळी गावकऱ्यांशी तसेच प्रशासकीय यंत्रणेशी संवाद साधत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीची पाहणी करण्यात आली. गावात तात्काळ शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी वॉटर फिल्टर बसविण्याची मागणी गटविकास अधिकारी, मेहकर यांच्याकडे करण्यात आली.

क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांनी ग्रामस्थांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, येत्या चार दिवसांत गावात वॉटर फिल्टर बसविण्यात न आल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

नवदांपत्यांना शुभेच्छा

यावेळी विविध ठिकाणी सदिच्छा भेटी देण्यात आल्या. आंध्रुड येथील नारायणभाऊ कऱ्हाळे यांचे बंधू गोपाल कऱ्हाळे यांच्या नुकत्याच भराडी (ता. सिल्लोड) येथे पार पडलेल्या विवाहानिमित्त त्यांच्या घरी भेट देऊन नवदांपत्यास सुखी, समृद्ध आणि मंगलमय वैवाहिक आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

तसेच आंध्रुड येथील विशाल देशमुख यांचे बंधू विनोद देशमुख यांच्या साखळी बु. (ता. बुलढाणा) येथे पार पडलेल्या विवाह सोहळ्यानंतर त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या.

घाटबोरी येथे सदिच्छा भेटी

मेहकर तालुक्यातील घाटबोरी येथे राजुभाऊ कळसकर व शैलेश देशमुख यांच्या घरी सदिच्छा भेट देण्यात आली. तसेच शंकर गिरी यांच्या दूध डेअरी व “डेली नीड्स” प्रतिष्ठानास भेट देऊन त्यांच्या व्यवसायासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

शिवपुराण कथा महोत्सवास उपस्थिती

सिंदखेड राजा तालुक्यातील साखरखेर्डा येथील पलसिद्ध स्वामी मठात सुरू असलेल्या पवित्र शिवपुराण कथा महोत्सवास उपस्थित राहून भगवान महादेवांच्या भक्ती, अध्यात्म आणि चरित्रावर आधारित कथाश्रवणाचा लाभ घेतला.

यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले, संदीप आसबे, राहुल मेहेत्रे, शरद देशमुख, राम बोरकर, सलीम शाह तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 9 7 6 4 6
Users Today : 46
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *