आयुष क्षेत्राच्या जागतिक विस्ताराला मिळणार नवे बळ
नवी दिल्ली प्रतिनिधी : आयुष भवन येथे आयुष एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल आणि Spices Board India यांच्यात महत्त्वपूर्ण सामंजस्य करार (एमओयू) करण्यात आला. या करारामुळे पारंपरिक वैद्यकीय पद्धती आणि आयुष क्षेत्राच्या जागतिक व्यापाराला नवे परिमाण मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
या कार्यक्रमाला संसदेमधील सहकारी तसेच आयुष एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष डॉ. अनुराग झांसी, मसाला मंडळाचे सचिव एम. एस. मणिवन्नन यांच्यासह दोन्ही मंत्रालयांचे वरिष्ठ अधिकारी आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी उपस्थित होते.
या धोरणात्मक भागीदारीमुळे आयुष क्षेत्राशी संबंधित उत्पादनांच्या निर्यातीला चालना मिळण्यासोबतच भारतीय पारंपरिक वैद्यकीय पद्धतींना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत अधिक व्यापक ओळख मिळणार आहे. विशेषतः औषधी वनस्पती, मसाले आणि आयुष उत्पादनांच्या गुणवत्तापूर्ण जागतिक पुरवठ्यासाठी हा करार महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
दरम्यान, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पनेला बळ देणारा हा उपक्रम असल्याचे सांगण्यात आले. या करारामुळे आयुष क्षेत्राचा प्रभाव जागतिक स्तरावर अधिक मजबूत होऊन भारतीय पारंपरिक औषध प्रणालीला नवी बाजारपेठ उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
Users Today : 46