जिल्हाधिकाऱ्यांच्या अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावांना भेटी

KHOZ MASTER
1 Min Read

विकासकामांची पाहणी; ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेत दिल्या सूचना

अंबाजोगाई प्रतिनिधी :
मा. जिल्हाधिकारी बीड यांनी अंबाजोगाई तालुक्यातील विविध गावांना भेट देत विकासकामांची पाहणी केली तसेच ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

मौजे भावठाणा येथे भेटीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी जनगणना कामकाजाची पाहणी केली. यावेळी अतिक्रमण हटवून शेतकऱ्यांना जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात आला. तसेच मानवलोक संस्थेला भेट देऊन आयोजित वृक्ष लागवड कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदविला.

यानंतर मौजे चिचखंडी येथे ग्रामस्थांशी थेट संवाद साधत त्यांच्या विविध अडचणी जाणून घेतल्या. पाणीपुरवठा, रस्ते, शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच गावातील इतर मूलभूत समस्यांबाबत चर्चा करून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

मौजे राक्षसवाडी येथे जिल्हाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावाची पाहणी केली. यावेळी ग्रामस्थांशी संवाद साधून नुकसानीची माहिती घेतली तसेच तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले.

“जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्यावर तत्परतेने कार्यवाही करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे,” असे यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या दौऱ्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले असून विविध प्रश्नांवर लवकरच कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *