खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात; कोणतीही जीवितहानी नाही*

KHOZ MASTER
1 Min Read

नांदेड

नांदेड दौऱ्यावर असताना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या ताफ्यातील चार गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हा अपघात ताफा प्रवासादरम्यान घडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून संबंधित वाहनांचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

घटनेनंतर ताफ्यातील सुरक्षा यंत्रणा आणि स्थानिक प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू आहे. खासदार शिंदे सुरक्षित असल्याची माहितीही समोर आली आहे.

या अपघातामुळे काही काळ परिसरात वाहतूक विस्कळीत झाली होती, मात्र ती पुन्हा सुरळीत करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *