मंगरूळ नवघरे : प्रतिनिधी
हिंदू सूर्य, शौर्य, स्वाभिमान आणि मातृभूमीप्रती अखंड निष्ठेचे प्रतीक असलेले महापराक्रमी वीर महाराणा प्रताप यांची जयंती चिखली येथील होमगार्ड कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
चिखली तालुका समादेशक होमगार्ड कार्यालयात आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन शिवसिंग राजपूत यांनी केले होते.
कार्यक्रमास चिखली पोलीस ठाण्याचे ठाणेदार भूषण गावंडे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी गाडे, पोलीस उपनिरीक्षक नितीनसिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते कैलास पंढरीनाथ सपकाळ, वैभव देहाडराय यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या शौर्यपूर्ण जीवनकार्याचा गौरव केला. त्यांच्या स्वाभिमान, धैर्य आणि राष्ट्रनिष्ठेच्या विचारांचा आदर्श समाजाने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.
महाराणा प्रताप यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समाजसेवेची भावना जोपासण्याचा संकल्प यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत हा अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. उपस्थितांनी महाराणा प्रताप यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या महान कार्याला अभिवादन केले.