कार्यालय, प्रतिनिधी – ग्रुप ऑफ मीडिया महाराष्ट्र ग्रुपची अभिनव वाटचाल.
आता विविध भाषेमध्ये इंग्रजी मराठी हिंदी सह ग्रीक इटालियन अशा विविध भाषेमध्ये खोज मास्टर वाचकांसाठी उपलब्ध राहणार आहे. महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये सक्षम नेतृत्व असलेल्या खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडियाने डिजिटलायझेशन चा उपयोग करत पत्रकारिता क्षेत्रात क्रांती केली आहे. गणेश चतुर्थी च्या शुभ मुहूर्तावर डब्ल्यू डब्ल्यू . खोजमास्टर . कॉम या अत्याधुनिक वेबसाईटचा लोकार्पण सोहळा स्वर्गीय धर्मवीर दिलीपराव रहाटे यांचे सुपुत्र शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष दादा रहाटे यांच्या हस्ते संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रामुख्याने मेहकर शहर शिवसेना प्रमुख किशोर भाऊ गारोळे , बुद्धिबळ सम्राट सुरेश चव्हाण, युवा नेते प्रवीण देशमुख,खोजमास्टरचे शुभम मगर ,प्रताप चव्हाण उपस्थित होते.
वेबसाईट ची विशेषता
जगातील आठ भाषेमध्ये वाचनास उपलब्ध, हवामान कोविड शेअर मार्केट अपडेट सुविधा.
क्रिकेट लाईव्ह स्कोर, राशिभविष्य, खोज मास्टर चे रिपोर्टर होण्यासाठी ऑनलाइन फॉर्म भरणे, ऑनलाइन आय कार्ड इशू करणे सुविधा..
मागील सात वर्षापासून खोज मास्टर परिवाराशी जिव्हाळ्याचा संबंध आहे. प्रिंटिंग क्षेत्रातून पदार्पण केलेल्या खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडियाने डिजिटल सोशल मीडियामध्ये आपले मानांकन वधारले आहे. मेहकर शहरात शुभारंभ झालेल्या खोज मास्टर ग्रुप ऑफ मीडियाची 16 जिल्ह्यांमध्ये यशस्वी वाटचाल सुरू आहे. निर्भीड निडर पत्रकारिता अनेक प्रकारचे पोलखोल, सर्वसामान्य ,शेतकरी शेतमजूर ,महिला ,पीडित व्यक्ती यांना न्याय देण्याचे काम प्रामुख्याने खोज मास्टर अविरत करीत आहे. राजकीय आर्थिक सामाजिक क्रीडा या क्षेत्रातील विश्लेषण मार्मिक शब्दात परिणामकारक करण्याचे धाडस खोज मास्टर परिवार करीत आहे. खोज मास्टरच्या या नवीन उपक्रमाला महाराष्ट्रासह देशभरात निश्चितच नावलौकिक आणि यशस्वी वाटचाल प्राप्त होईल, याबाबत तीळमात्र शंका नाही. खोज मास्टरच्या पुढील वाटचालीस मनपूर्वक शुभेच्छा– आशिष दादा रहाटे उपजिल्हाप्रमुख शिवसेना बुलढाणा
सर्वसामान्य माणसाची पत्रकारिता क्षेत्रात सुरू असलेली घोडदौड कीर्तिमान यशस्वी व्हावी. खोज मास्टर परिवाराचे मुख्य संपादक रमेश चव्हाण यांच्या सांज दैनिक खोज मास्टर , यूट्यूब चैनल फेसबुक पेज इंस्टा पेज ट्विटर अकाउंट त्याचप्रमाणे डिजिटल सोशल मीडिया कंपनी या सर्व शाखेचा प्रत्यक्ष साक्षीदार मी आहे. अनेक वेळा अशा अद्भुत कल्पना आणि ज्यावेळी संपादक माझ्याकडे येत होते त्यावेळी मला सुद्धा याबाबत यशस्वीतेची शंका वाटत असे, आज सुद्धा एकापेक्षा जास्त भाषेमध्ये यांनी वेबसाईट सुरू केली आहे अशाच प्रकारचा अफलातून उपक्रम यांनी सुरू केला निश्चितच तो सुद्धा यशस्वी केल्याखेरीज खोज मास्टर परिवार राहणार नाही .अशी शाश्वती आहे. खोज मास्टर परिवाराच्या सर्व आयाम तसेच सर्व सभासदांना डिजिटल मीडियाच्या क्रांतिकारक पर्वत एक अभिनव उपक्रम सुरू केल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा— किशोर भाऊ गारोळे ,शहर प्रमुख शिवसेना मेहकर
Users Today : 36