सोयगाव तालुका गोकुळसिंग राजपुत
थायलंड देशातील बौद्ध धम्म गुरु भंतेजी प्राध्यापक सिटीचौक अचांग, सायंकाळ वाजता फर्दापुर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर बुद्ध विहाराजवळ आगमन होताच फर्दापुर येथील बौद्ध उपासक,उपसिका यांनी रस्त्यावर पुष्पवृष्टी करून भन्तेजी यांचे स्वागत करण्यात आले.त्यांनी स्वतः हा बुद्धविहारास 2020 मध्ये दान केलेली 6 फुटांची बुद्ध मूर्ती जवळ सर्व उपासक,उपासिका यांनी त्रिसरण पंचशील बुद्ध वंदना घेण्यात आली. नंतर फर्दापुर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास वाघमोडे यांनी भन्ते प्रा. सिटीचोक अचांग यांचे पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर 90 विद्यार्थी, विद्यार्थ्यांना एक बॅग,2 रजिस्टर,1 वही,1 चित्रकला बुक,1 कलर बॉक्स,खोड रबर,पेन्सिल बॉक्स,शॉपनर,पेन बॉक्स, शालेय साहित्यसह शिक्षणासाठी शिष्यवृत्ती म्हणून पाकीट रोख रक्कम वाटप करण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे सर्व नियोजन धम्मसेवक विशाल शिंदे यांनी केले. निस्वार्थपणे जबाबदारी स्विकारून लहान मुलांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. साहित्य वाटप करताना प्रत्येक लहान मुले,मुली यांना भन्तेजी प्राध्यापक सिटीचोक अचांग व ग्रामपंचायतचे माजी सदस्य भीमराव बोराडे ,रमेश दामोदर, राजू शिंदे, यांच्या हस्ते 90 विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य साहित्य वाटप करण्यात आले.त्यावेळी नितीन शिंदे,सुमित शिंदे,अभय दामोदर, विकी शिंदे,प्रा.आर.बि. जाधव,राहुल जाधव,सुजित म्हस्के, मोठया संख्येने बौद्ध उपासक,उपासिका, उपस्थित होते.10 ब्लँकेट सुद्धा वाटप करण्यात आले. लकी भन्तेजी यांचा जीवन प्रवास हा गेल्या सहा वर्षांपासून भारतात वास्तव्यास आहे ते सध्या औरंगाबाद येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे जगप्रसिद्ध अजिंठा बुद्धलेणी, वेरूळ बुद्ध लेण्यांवर पीएचडी करीत आहे. अत्यन्त गरीब परिस्थितीतुन त्यांनी शिक्षण घेतले. प्राध्यापक सिटीचोक अचांग हे काही वर्षांपूर्वी अजिंठा लेणीला भेट देण्यासाठी आले असता फर्दापुर येथील बौद्ध उपासक विशाल शिंदे, यांना सर्व देशातील भाषा बोलता येते असे नावाजलेले उपासक विशाल राजू शिंदे ,यांच्याशी त्यांची भेट झाली त्यांच्याच माध्यमातून भंतेजी प्राध्यापक सिटीचोक अचांग, (थायलंड) हे दरवर्षी फर्दापुरला येतात व बौद्ध लहान मुलं मुले यांना आपल्या स्वखर्चांमधून शालेय शिक्षण साहित्य वाटप करत असतात. बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी औरंगाबाद येथे वास्तव्य करत आहेत भन्तेजी यांच्या कार्याबद्दल अनुमोदन व आभार पत्रकार प्रविण तायडे यांनी मानले.
Users Today : 12