प्रविण चव्हाण नंदुरबार
जिल्ह्यातील पाच पोलिस अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात बदल्या करण्यात आल्या असून याबाबतचे आदेश पोलिस अधिक्षक पी.आर.पाटील यांनी दिले आहे . दरम्यान , स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे .
यामध्ये नंदुरबार येथील नियंत्रण कक्षातील पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर लक्ष्मण वारे यांची नवापूर पोलिस ठाणे येथे रिक्तपदी बदली करण्यात आली आहे . नंदुरबार शहर पोलिस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या निरीक्षकपदी बदली करण्यात आली आहे .
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र कळमकर यांची नंदुरबार शहर पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे .तर शहादा पोलिस निरीक्षक दीपक किसनराव बुधवंत यांची नंदुरबार नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे . तर अक्कलकुवा पोलिस ठाण्याचे निरीक्षक अन्साराम अटवाजी आगरकर यांची शहादा पोलिस ठाणे येथे बदली करण्यात आली आहे . दरम्यान , संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये संबंधित अधिकाऱ्यांनी कालच पदभार घेतल्याचे समजले आहे .
प्रशासकीय कारणास्तव तात्पुरत्या स्वरुपात सदरच्या बदल्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे .
Users Today : 38