सोयगाव शेतकऱ्यांना नुकसानभरपाईचे अनुदान एकाच  टप्प्यात देणार..

Khozmaster
1 Min Read
तहसीलदार रमेश जसवंत यांची माहिती
सोयगाव तालुक्यात यंदाच्या अतिवृष्टीच्या नुकसानीच्या अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या ठेत खात्यावर एकाच वेळी मिळणार असून अनुदानाचा रक्कमेत टप्पे पडू नये, यासाठी तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दखल घेतली असल्याचे तहसीलदार रमेश जसवंत यांनी बोलताना सांगितले.मदत जाहीर केली होती. यावर्षी तालुका प्रशासनाने दिलेल्या नुकसानीच्या अनुदानाच्या पद्धतीत बदल केला आहे. त्यामुळे एकदाच पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना खात्यावर मागील वर्षीच्या नुकसानीच्या प्राप्त होणार आहे. तालुक्यात जिल्हा आपत्ती परतीच्या पावसाने व अतिवृष्टीच्या व्यवस्थापन विभागाने दोन टप्प्यात पावसाने ३६ हजार ४६८ हेक्टरवर क्षेत्र बाधित झाले असून ३३ हजार ९८० नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना यंदा तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे शेतकऱ्यांना मिळणार आहे. पन्नास कोटी ५९ लक्ष इतकी रक्कम ३३ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे यंदाच्या नुकसानीच्या मदतीसाठी टप्पे पडणार नसून पूर्ण रक्कम शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.”शेतकऱ्यांना हि मदत नोव्हेंबर अखेर पर्यंत मिळणार तालुक्यात शेतकऱ्यांच्या शेताचे नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे अशी माहिती सोयगाव तालुका कृषी अधिकारी एस.जी.वाघ यांनी सांगितले. यामध्ये मका ९८० हेक्टर, कपाशी ३२ हजार ६८८ हेक्टर आणि सोयाबीन २८३१ हेक्टरवर बाधित झाले आहे.यासाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रमाणे प्रतिहेक्टरी शेतकऱ्यांना मदत दिली जाणार आहे. पंधरा दिवसांत हि मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल. असे सोयगाव तहसीलदार रमेश जसवंत यांनी बोलताना सांगितले.
0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *