रस्ता दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा
सतीश मवाळ मेहकर बुलढाणा
या मुख्य रस्त्यातील जानेफळ नाका शिवजी चौक वार्ड नं. 15 मेहकर येथील नालिच्या कामासाठी फोडलेल्या मुख्य रस्त्याचे तात्काळ दुरूस्ती (कॉक्रेटिकरन) करून देण्यात यावे यासाठी M.S.R.D.C. विभागाला निवेदन देण्यात आले. निवेदन देते वेळी नागेश घोडे ,स्वप्निल राउत, रवि मिस्कीन, शुभम पानखेडे, महेश गायकवाड, व इतर जन सहभागी होते.आपल्या विभागा मार्फत, काही दिवसापुर्वी खामगाव नाका शिवाजी चौक वार्ड नं. १५ येथील एका नालीतील पाणी दुसऱ्या नालीत सोडण्यासाठी मुख्य रस्ता फोडुन मोठे पाईप टाकण्यात आले होते. पाईप बुजवण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात मुरूम टाकण्यात आला होता परंतु त्याठिकाणी कोणतीही कायम स्वरूपी उपाययोजना करण्यात आली नव्हती त्यामुळे त्या रस्त्यावर खड्डे पडुन मुरुम उघडा पडला आहे यामुळे नागरिकांना अनेक त्रासांना सामोरे जावे लागत आहे जसे की, चालत्या गाडीमुळे दगड उडुन लागणे, वृद्ध व्यक्तीस येण्या जाण्यास त्रास होणे, त्याचबरोबर त्याठिकाणी अपघाताचे प्रमान वाढले आहे व त्याठिकाणी धुळीचे साम्राज्य पसरले आहे व धुळीमुळे नागरीकांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे.तरी परिसरातील नागरीक तसेच येणाऱ्या जाणाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे तरी आपण त्या रस्त्याचे दुरुस्तीकरण (कॉक्रेटीकरण) करण्यात यावे विनंती अर्ज मध्ये नमूद केले आहे. अन्यथा त्याठिकाणी रस्ता दुरुस्ती करणासाठी आंदोलन करण्यात येईल.असा इशाराही यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
Users Today : 29