पत्रकार…
पत्रकार दुधारीतलवार
घाली काळजा थेटवार
जिथे ना पोचे रविकवी
लीलया प्रकटे आरपार
जणूं सरस्वती अवतार
दावी लेखणी चमत्कार
नवरसांचाअमृतकलश
नटराजाचा साक्षात्कार
दीनदुबळ्या तारणहार
वेदना पुसे तो हळूवार
आवाज मुक बधिरांचा
शोषीतांचा देई आधार
त्यालाचं भिते दहशत
जीवावर सदैव उदार
भिडभाड माहीत नाही
ना उपकार ठेवे उधार
करी अद्भुत चमत्कार
रेअष्टावधानी जादुगार
कधी तया करे विचार
त्याला ना पेंशन पगार
रे प्रसव वेदना असह्य
जन्मावा लागे पत्रकार
निदान मानावे आभार
नव युगाचा तो हुंकार
– हेमंत मुसरीफ पुणे
9730306996
Users Today : 22