इन्फेक्शनमुळे गोरा दगावल्याचे पशुपालक यांचा आरोप

योगेश नागोलकार राहेर
तालुक्यातील उमरा गावातील शुभम इंगळे यांचा १० वर्षाचा गोरा मंगळवारी (दि. १५)रोजी लम्पी रोगाने मृत्यू झाला आहे. उमरा गावामध्ये लम्पी आजाराने दुसरा मृत्यू झाला असून, एका महीन्यापूर्वी एका गायीचा मृत्यू झाला होता. लम्पी रोगाने गावामध्ये शिरकाव केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.इंगळे कुटुंबामध्ये आवड म्हणून गोरा सांभाळत होते; परंतु यावर्षी लम्पी आजाराने तालुका, जिल्ह्यामध्ये अनेक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अजूनही जनावरांसाठी योग्य ती लस नसल्याने मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे. लम्पीमुळे गोरऱ्याचा मृत्यू झाल्याने १० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सरकारी दवाखान्यात उपचारासाठी डॉक्टरांनकडे उपचार केला सरकारी मधून उपचार केले जाईल पण लस उपलब्ध नसल्याने आपल्याला प्रायव्हेट मधून औषधे आणावी लागेल सरकारी डॉक्टर आणी औषधीचे १००० रूपये बिल डॉक्टरांनी उपचार करून काढले दोन दिवस इंजेक्शन देऊन गोरऱ्यांच्या मानेला दिलेल्या इंजेक्शनामुळे इन्फेक्शन होऊन रक्त पुरवठा सुरू होऊन आज रोजी गोरऱ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पशुपालक यांनी केला आहे. डॉक्टरांनी दिलेल्या इंजेक्शना वर इंजेक्शन देऊन इन्फेक्शन होऊन रक्त पुरवठा वाहुन गोरऱ्याचा मृत्यू झाला आहे.तरी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या घडलेल्या बाबीकडे गंभीरपणे पाहून आर्थिक मदत देण्यात यावी व त्या डॉक्टरांनी केलेल्या उपचाराची चौकशी करून घ्यावी व लस उपलब्ध करून द्यावी अशी मागणी उमरा गावातील नागरिकांन कडून होत आहे लम्पीच्या आजारापासून गोरऱ्याला वाचविण्यासाठी शासकीय सरकारी डॉक्टर तसेच खासगी डॉक्टर ही प्रयत्न करत होते; परंतु डॉक्टरांच्या हाती अपयश आले. दि.१५ रोजी गोरऱ्याचा मृत्यू झाला. यामुळे इंगळे कुटुंबाचे अश्रू अनावर झाले. गोरऱ्याच्या मृत्यूने गावांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.तसेच दहा दिवसांपासून गोरऱ्याला लम्पीचा प्रादुर्भाव झाल्याने इंगळे कुटुंबीयांनी त्याच्या उपचारासाठी हजारो रुपये खर्च करूनही गोरऱ्याचा मृत्यू झाला. त्यामुळे इंगळे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. राज्य शासनाने लम्पीच्या रोगासाठी लवकरात लवकर योग्य ती लस आणून ग्रामीण भागातील जनावरे वाचवायला हवीत.
Users Today : 23