सस्ती शिवारात अवैध वृक्षतोडीची वाहतूक करताना ट्रक्टर जप्त ! 

Khozmaster
2 Min Read
चान्नी पोलिसांनी घेतले ताब्यात आलेगाव वनपरिक्षेत्राची कार्यवाही
योगेश नागोलकार राहेर पातुर
 
तालुक्यातील आलेगाव वनपरिक्षेत्र  अंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील सस्ती चतारी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून अवैध वृक्ष तोड सुरू असुन आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी व कर्मचारी यांच्या आशिर्वादाने अवैध वृक्षतोड चांगली फोफावली असुन सदर बातमीची दखल चान्नी पोलीसांनी घेतली असून जप्त केलेल्या अवैध वृक्षतोड च्या वाहनावर कारवाई करण्यासाठी आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेकडे वर्ग करण्यात आले आहे.
शासन वृक्षलागवडी साठी करोडो रूपये खर्च करून पर्यावरणाचा समतोल कायम राखण्यासाठी प्रयत्न करीत आहे तर दुसरीकडे ग्रामीण भागातील अवैध वृक्षतोड करणारे ठेकेदार शासनाच्या धोरणाची पायमल्ली करून झपाट्याने अवैध वृक्षतोड करीत आहे यामुळे जंगल भकास होत असल्याने शासनाच्या वृक्षलागवड या धोरणावर पाणी फिरवण्याचे काम करीत आहेत यावर आळा घालण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी अवैध वृक्षतोड करणाऱ्या वर कारवाई चा बडगा कायम ठेवण्याची गरज आहे
आलेगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या सस्ती येथे गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड होत असल्याने या परिसरातील वृक्ष कत्तल केल्यामुळे हा परिसर भकास होत असल्याचे चित्र दिसुन येत आहे सदरच्या अवैध वृक्षतोड च्या गुप्त माहिती वरून चान्नी पोलीस स्टेशन चे  ठाणेदार योगेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी पाठवून अवैध वृक्ष तोडून वाहतूक करीत असताना ट्रक्टर पकडून चान्नी पोलीस स्टेशन ला जमा करण्यात आला सदरच्या ट्रक्टर ची माहिती आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण यांना देण्यात आली ट्रक्टर  क्रमांक एम एच ३८ , २८७० ह्या ट्रक्टर च्या ट्राली मध्ये आडजात अवैध वृक्षतोड केलेली लाकडे वाहतूक करताना यांनी ताब्यात घेतला आला असुन ट्रक्टर ट्रालीसह चान्नी पोलीस स्टेशनला जमा करण्यात आला आहे सकाळी ७ वाजता चान्नी पोलीसांनी अवैध वृक्षतोड असलेला ट्रक्टर ताब्यात घेऊन सदरच्या विभागाला पुढील कारवाई साठी अवगत करून सुद्धा संध्याकाळी उशिरा आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी ट्रक्टर ताब्यात घेतला असुन सदरच्या ट्रक्टर चालक व अवैध वृक्ष तोड करणाऱ्या ठेकेदाराची राञी उशिरापर्यंत चौकशी सुरू असुन गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पुढील तपास आलेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी चव्हाण करीत आहेत.
0 9 4 8 0 5
Users Today : 45
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *