छत्रपती संभाजी महाराज यांच्या बद्दल अमानकारक वक्तव्य करणारे काँग्रेसचे नेते कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांचा तीव्र निषेध…
योगेश नागोलकार राहेर
हिंदूधर्म आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत अवमानकारक वक्तव्य करणारे कर्नाटक काँग्रेसचे नेते सतीश जारकीवली याच्याविरोधात १२ नोव्हेंबर २०२२ शनिवार रोजी पातूर तालुका व शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आले.कर्नाटक काँग्रेस प्रदेश समितीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीवली यांनी हिंदू हा पर्शियन शब्द असून, त्याचा अर्थ अत्यंत घाण आहे. हिंदू हा शब्द आमच्यावर का थोपवला जातोय? असा प्रश्न उपस्थित करीत आक्षेपार्ह विधान केले होते. तसेच, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या ‘‘धर्मवीर’’ उपाधीचा व मराठ्यांचा अपमान करीत धर्मवीर उपाधीसाठी मराठे लायक नाहीत, अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रासह तमाम हिंदू बांधव आणि शिव-शंभूप्रेमींमधून संताप व्यक्त होत आहे. जनतेच्या भावना लक्षात घेऊन कठोर कार्यवाही करण्याची यावी अशी मागणी करत पातूर भारतीय जनता पार्टी च्या वतीने तहसीलदाराना निवेदन देण्यात आले यावेळी उपस्थित म्हणून रमण जैन ,विजयसिंह गहिलोत ,प्रेमानंद श्रीरामे ,चंद्रकांत अंधारे ,राजु उगले ,कपिल खरप ,अभिजीत गहिलोत ,रामाभाऊ गोळे ,विनेश चव्हाण ,संदीप तायडे ,गणेश गाडगे ,राजेश आवटे ,सचिन ढोणे ,मंगेश गाडगे ,दिलीप डोंगे ,अशोक एवारे ,संजय उजाडे ,डिगांबर गोतरकर ,महिला आघाडीच्या सौ वैशाली निकम ,सौ तुळसाबाई गाडगे , कु.रुपाली राऊत ,सौ प्रिया कोथळकर ,राजाराम देवकर,गजानन शेंडे ,गिरी गुरुजी , डॉ.सुनील आवटे ,माणिक ईंगळे ,नारायण हरमकर ,संजय गोतरकर ,रंजीत देशमुख ,नितिन ईंगळे ,विट्ठल काळे ,गजानन भोकरे ,सिताराम हांडे ,धर्मा देवकर ,विट्ठल ताले ,गोपाल सोनोने उपस्थित होते.
Users Today : 45