प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
आपल्या जिल्ह्यातील मुलांमध्ये विविध प्रकारचे गुण दडलेले आहेत त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा . तसेच त्यांच्या मधील असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धा या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील . या माध्यमातून चांगले खेळाडू घडविण्यात मदत होईल असे प्रतिपादन खा . डॉ . हिना गावित यांनी क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी केले .
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयामार्फत भगवान बिरसा मुंडा जयंती व जनजाती गौरव दिनानिमित्त जिल्हा क्रीडा संकुल येथे भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन खा . डॉ . हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष डॉ . सुप्रिया गावित या होत्या . यावेळी आमदार आमश्या पाडवी , जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक , मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे , राजश्री वळवी , प्रकल्प अधिकारी मीनल करणवाल हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमा प्रतिमेचे विविध मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले . तसेच क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन खा . गावित यांच्या हस्ते करण्यात आले . उद्घाटन झाल्यानंतर हवेत तिरंगा कलर चे फुगे सोडण्यात आले .
यावेळी खा . डॉ . हिना गावित म्हणाल्या आपल्या भागातील विद्यार्थ्यांना खेळाची आवड आहे विविध ठिकाणी खेळामध्ये आपल्याकडील विद्यार्थी नावलौकिक मिळवीत आहेत . मात्र त्यांना योग्य प्रशिक्षणाची गरज आहे या स्पर्धांमुळे त्यांच्या कलागुणांना वाव मिळत असतो असे त्यांनी सांगितले . तसेच त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवना बद्दल माहिती दिली.यावेळी अध्यक्षा सुप्रिया गावित यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या बद्दल माहिती दिली स्पर्धेतील विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.या स्पर्धेसाठी ढोंसाकळी , खडकी , पाटलीपाडा येथील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला . हँडबॉल आणि हॉलीबॉल या दोन स्पर्धा घेण्यात आल्या . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी एस . एल . काकडे , एस . एस . पटेल , राहुल पवार , एस . एम . चौधरी , के . एस . मोरे , एन . आर . माळी , किशोर गोसावी , डी.एच.माळी , एस . आर . पाटील , व्ही . व्ही . सोनार , आर . एन . निकम यांनी परिश्रम घेतले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सविता एंडाईत यांनी केले तर प्रास्ताविक एस . एस . पटेल यांनी केले कार्यक्रमाला शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते .
Users Today : 38