प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
तालुक्यातील ठाणेपाडा घाटाजवळ एस.टी. बसने चारचाकी वाहनाला धडक दिल्याने चौघांना दुखापत झाली असून याप्रकरणी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार , नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील सुरेश पुना बेडसे हे त्यांच्या चारचाकी ( एम.एच .१५ ( एम.एच .१५ जीएल ३३ ९ १ ) वाहनाने नंदुरबार – नाशिक रस्त्याने जात होते . यावेळी विजय गोपीनाथ सोनवणे ( रा . नामपूर ता .सटाणा ) याने त्याच्या ताब्यातील एस.टी. बस ( क्र . एम.एच .११ बीएल ९ ३२५ ) रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात एस.टी.बस चालवून ठाणेपाडा घाटाच्या खाली आष्टे गावाजवळील विटभट्टीजवळ चारचाकी वाहनाला मागून धडक दिल्याने अपघात घडला .
यात चारचाकी वाहनातील सुरेश पुना बेडसे , अरुणा सुरेश बेडसे , दिलीप धुडकू बागले व मंदाकिनी दिलीप बागले ( सर्व रा . इंद्रायणी कॉलनी , चांदवड जि . नाशिक ) यांना दुखापत झाली . तसेच वाहनाचेही नुकसान झाले .याबाबत सुरेश बेडसे यांच्या फिर्यादीवरुन नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात विजय सोनवणे याच्याविरोधात भादंवि कलम २७ ९ , ३३७ , ४२७ , मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
पुढील तपास पोहेकॉ.सुरेश वसावे करीत आहेत .
Users Today : 38