आपले ठाकरे ..
ठाकरेजी शैलीखास
घडवला रे इतिहास
धन्य धन्य ते रे झाले
जया लाभे सहवास
व्यंगचित्रकार निर्मळ
मनी न कधी उपहास
कसा असावा माणूस
असावा कसाउल्हास
व्यंग नाही देश प्रेमात
हिंदुत्वावरती विश्वास
समर्पित हिंदूत्व भाव
दिलेअवघ्या विश्वा स
केली ना हाव सत्तेची
खुर्ची केवळ आभास
गादी नसूनही जवळ
साहेब झुकवी नभास
मराठी अस्मिता जागे
जागृत करे माणसास
लढले ते हक्का साठी
असेतो आखरी श्वास
मार्मिकबोली बिनधास
सभा गाजवे हमखास
रे आम आदमी करिता
उत्साह प्रज्वली खास
भगवा कुठेही दिसता
होई अस्तीत्व आभास
बाळासाहेब आपलेचं
जाणवे अजूनि प्रभास
– हेमंत मुसरीफ पुणे
९७३०३०६९९६
www.kavyakusum.com
Users Today : 6