लंम्पी आजाराने जनावरे मृत पावलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या- रिपब्लिकन सेनेची मागणी

Khozmaster
2 Min Read
चिखली‌ प्रती. बुलढाणा
जिल्ह्यातील लंम्पी आजाराने ग्रस्त व मृत्यू झालेल्या जनावरांच्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी तसेच आजाराने ग्रस्त असलेल्या जनावरांना वेळीच उपचार देण्यात यावे असे निवेदन रिपब्लिकन सेनेच्या वतीने दि. १५ नोव्हेबर रोजी जिल्हाधिकारी, बुलढाणा यांना देण्यात आले. यावेळी रिपब्लिकन सेनेचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष भाई विजयकांत गवई, जिल्हा उपाध्यक्ष ब्रह्मभाऊ साळवे, महासचिव शेख सलिम हे उपस्थित होते.
बुलडाणा जिल्ह्यात शेतकऱ्यांवर जुलमी सरकार व नैसर्गिक प्रकोपाने सतत काही ना काही संकट येतच असतात गेल्या दोन वर्षापासून त्रस्त शेतकरी कोरोना महामारीतून सावरत नाही तोच लांबीच्या सार्थाने दुभेत जनावरे व शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून कष्ट करून पूर्ण जगाच पोट भरतो गोवंश तसेच इतर जनावरे दगावली जात आहेत. बुलढाणा जिल्ह्यात योग्य उपचार व निदान होत नसल्याने जनावरे दगावण्याची शक्यता वाढली असून बुलढाणा जिल्हा तालुक्यातील पशु अधिकारी डॉ.हे एक जनावर तपासले की व्हाट्सअप, फेसबुक वर पोस्ट व्हायरल करतात आणि एखादा जनावर मृत्यू पडला की तो डॉ. पशुधिकारी त्या मृत पडलेल्या जनावरांना सुद्धा पाहण्यासाठी त्याच्याजवळ वेळ नसतो शेतकऱ्यांनी डॉक्टरांना फोन केला की तो उडवा उडवी चे उत्तर देतात मी तालुक्यात एकच डॉक्टर आहे किती जनावरांना बघणार अशा हलगर्जीपणामुळे लांबीच्या आजाराने जे जनावर दगावले आहेत त्यांना कारणीभूत फक्त तालुक्यातील पशु अधिकारी आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी जिल्ह्यामध्ये हजार दोन हजार पेक्षा जास्त जनावरे मृत्यू झालेले आहेत शेतकऱ्यांना राज्य सरकारने तात्काळ आर्थिक मदत घोषित करावी अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल.
0 9 4 6 7 9
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *