कृषी विभागामार्फत तितूर येथे रब्बी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिकाचे आयोजन 

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यात  तितूर येथे रब्बी बीजप्रक्रिया प्रात्यक्षिक आयोजन सोयगाव कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले.रब्बी पिक उत्पादकता वाढ मोहिमे अंतर्गत हरभरा बियाण्याचे बिज प्रक्रिया प्रात्यक्षिक राबविण्यात आले. यावेळी कृषि सहाय्यक ललिता साळवे यांनी हरभरा प्रति 10 किलो बियाण्यास 100 ते 200 मि ली महा एन पि के जिवाणू संघ बियाण्यास लावावे असे सांगितले. बीज प्रक्रिया केल्याने जममीणीवर बळावर येणारी बुरशी थांबते त्यामुळे मुळ्यांचा जमिनीत विकास होऊन अन्नद्रव्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतात. परिणामी पिक जोमाने वाढते एकंदरीत उत्पादनात दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढ होण्यास मदत होते अशी माहिती कृषी सहाय्यक ललिता साळवे यांनी दिली व शेतकऱ्यांना बीज प्रक्रिया प्रात्यक्षिक करून दाखविले.यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच,शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *