जि. प. प्रा. शाळा सावळदबारा येथे भगवान बिरसा मुंडा जयंती साजरी

Khozmaster
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथे दि १५ नोव्हेंबर २०२२ रोजी जि.प.प्रा. शाळा येथील शाळेत क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन केंद्र प्रमुख एम.डी.सोनवणे व भागवत गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले तर उपस्थित मुलांना क्रांतिसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या विषयी सखोल माहिती व भगवान बिरसा मुंडा यांनी केलेल्या इंग्रज सरकार विरोधातील उठाव संदर्भात थोडक्यात माहिती ही सतीश डोणेसर यांनी मुलांना अवगत करून दिली. शाळेतील मुलांना भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनचरित्रावर आधारित उलगु एक क्रांती हा चित्रपट देखील दाखवण्यात आला.याप्रसंगी प्रा.जीवन कोलते पाटील, शाळेय समितीचे अध्यक्ष सुपडा तडवी,उपसरपंच मो.आरिफ मो.लुखमान, फकीराभाऊ तडवी, शिक्षकवृंद, केंद्र प्रमुख एम.डी.सोनवणे, भागवत गायकवाड, सतीश ढोणे,गवई सर,हिरास मँडम, अंगणवाडी सेविका, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 7 7 4
Users Today : 14
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *