जिल्हा रुग्णालयात ५०० रुग्णांना फळ वाटप; ‘अमर रहे’च्या दिल्या घोषणा
प्रविण चव्हाण नंदुरबार
बाळासाहेबांच्या शिवसेने तर्फे आज शहरात हिंदु हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिवस निमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रतिमापूजनासह जिल्हा रुग्णालयात ५०० पेक्षा अधिक रुग्णांना फळे वाटप करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी अमर रहे अमर रहे बाळासाहेब अमर रहे अशा घोषणा देत.हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृती दिवस निमित्त गुरुवारी आमदार कार्यालयात जि.प सदस्य तथा बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड राम चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अमर रहे अमर रहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे, जय भवानी शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देण्यात आल्या .शासकीय जिल्हा रुग्णालयात साधारणता ५०० पेक्षा अधिक रुग्णांना बाळासाहेबांच्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ॲड राम रघुवंशी व पदाधिकाऱ्यांनी फळ वाटप केले. याप्रसंगी पं.स सभापती माया माळसे, उपजिल्हाप्रमुख रवींद्र गिरासे, जि.प सदस्य देवमन पवार,महानगर प्रमुख विजय माळी, जि.प माजी सदस्य डॉ. सयाजीराव पाटील, पं.स सदस्य कमलेश महाले,नगरसेवक रवींद्र पवार,नगरसेवक गजेंद्र शिंपी, नगरसेवक जगन्नाथ माळी, कृउबा समिती संचालक किशोर पाटील, ज्येष्ठ कार्यकर्ते ताराचंद माळसे,माजी पं.स सदस्य धर्मेंद्र परदेशी,माजी तालुका प्रमुख व्यंकट पाटील, माजी पं.स सदस्य संतोष धनगर,चेतन वळवी,सुनील गिरासे, हितेश राजपूत, प्रफुल खैरनार,अविनाश पाडवी,भैय्या मराठे,अर्जुन राजपूत, अलपेश राजपूत,आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Users Today : 23