प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंचे प्रमाण कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीसांना मोठे यश. याबाबत अधिक माहिती अशी की, संपूर्ण भारतात व महाराष्ट्रात ठिक-ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण वाढत असून रस्ते वाहतूक अपघातात मध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. वेगवेगळया कारणांमुळे असे रस्ते अपघात होत असतात. त्यामुळे मनुष्यहानी होवून वाहनांचेही नुकसान होत असते.
पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघातातील मृत्युंचे प्रमाण पाहून ते प्रमाण कमी करण्याचा निश्चय केला. याकामी सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग यांचे सहकार्य घेवून नंदुरबार जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण कमी करण्याचे निश्चित केले. त्या अनुषंगाने नंदुरबार जिल्हा घटकात सर्व पोलीस ठाणे, शहर वाहतूक शाखा यांच्याकडून मोठ्या प्रमाणात रस्ते अपघात होत असलेल्या ठिकाणांची (Black Spots) माहिती प्राप्त केली. सदर ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभाग व परिवहन विभाग यांची मदत घेवून रस्ते दुरुस्ती, फलक, रस्त्यांवरील अडथळे हटविणे इत्यादी आवश्यक त्या उपाययोजना केल्या.
त्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे रस्ते वाहतूक अपघात कमी होण्यास मदत झाली.
रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण वाढण्यास दारूचे सेवन करून वाहन चालविणारे मद्यपी वाहन चालक हे देखील मोठ्या प्रमाणात कारणीभूत असल्याने पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्हा घटकात आदेश देवुन वेळोवेळी ड्रंक ऍ़न्ड ड्राईव्हची प्रभावी मोहिम राबवून पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखा मार्फतीने मद्यपी वाहन चालकांविरूध्द मोठ्या प्रमाणात कारवाई केलेली आहे. सदर कारवाई मध्ये मद्यपी वाहन चालकांचे वाहतूक परवाने रद्द होण्याचे प्रस्ताव उप प्रादेशीक परिवहन विभाग, नंदुरबार यांना सादर केले. परिणाम स्वरुपी आज पावेतो एकूण-169 मद्यपी वाहन चालकांचे वाहतूक परवाने देखील रद्द करण्यात आले आहेत. याकामी उपप्रादेशीक परिवहन अधिकारी, नंदुरबार यांचे सहकार्य मिळाले.
दिवसेंदिवस वाढत चाललेल्या रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षक, नंदुरबार यांनी नंदुरबार जिल्ह्यात पोलीस दलाच्या वतीने जनजागृती मोहीमा राबविल्या गेल्या. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने अपघाता नंतर जखमी इसमास रक्ताची उणीव भासू नये म्हणून मध्यंतरीच्या काळात जिल्हा रुग्णालय, नंदुरबार यांचे सहकार्याने एक रक्तदान शिबीरही आयोजित केले होते.
तसेच वारंवार अपघात होणारी ठिकाणे निश्चित करुन, अपघातांच्या कारणांचा अभ्यास करुन त्या त्रुटी दुर केल्या. रस्त्यांवरील वळणे तसेच खड्डे दुरुस्ती, घाटात कठडे बसवून घेणे या सारख्या उपाय योजना करण्यात आल्या. यासाठी संबधीत विभाग प्रमुखांची बैठक पोलीस अधीक्षक यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यात अपघाताबाबत विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली होती.
नंदुरबार जिल्हा घटकात रस्ते वाहतूक अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी वरील प्रमाणे केलेल्या उपाययोजनांमुळेच सन 2021 च्या तुलनेत सन 2022 या चालू वर्षात आज पावेते रस्ते वाहतूक अपघाती मृत्युंची संख्या तब्बल 26 ने कमी करण्यात नंदुरबार जिल्हा पोलीस दलाला यश मिळाले आहे.
सदरची बाब ही नंदुरबार जिल्हा पोलीस दलासाठीच नव्हे तर सामान्य नागरिकांसाठीही अत्यंत कौतुकास्पद व दिलासादायक असून पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दलाने सार्वजनिक बांधकाम विभाग, परिवहन विभाग यांचे सहकार्याने राबविलेल्या उपाय योजनेमूळेच यावर्षी नंदुरबार जिल्ह्यात रस्ते वाहतूक अपघात व यात अपघाती मृत्युंची संख्या कमी होण्यास मदत झालेली आहे.यापूढेही जिल्ह्यातील रस्ते अपघातातील मृत्युंचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न जिल्हा पोलीस दला तर्फे करणेत येत असुन दारु पिऊन वाहन चालवितांना कोणी दुचाकी चारचाकी स्वार आढळुन आल्यास त्यांचेवर अधिक कठोर कारवाई करुन लायसन्स निलंबित करण्याची कारवाई करण्यात येईल असे,पोलीस अधीक्षक, पी. आर. पाटील नंदुरबार यांनी सांगितले.नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे नंदुरबार जिल्ह्यातील जनतेला आवाहन येते की, रस्त्यावर लावण्यात आलेल्या निर्देशक फलकांचा नागरिकांनी वापर करावा, दारु पिऊन कोणीही वाहन चालवू नये, दारु पिऊन वाहन चालविणे केवळ त्यांच्यासाठीच नव्हे तर इतरांचे जिवितास देखील धोकेदायक आहे. नागरीकांनी स्वतःचे व इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतुकीचे नियमांचे पालन करावे…
Users Today : 37