नांदुरा प्रतिनिधी शुभम ढवळे
भारताचे मा. पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या आशीर्वादाने भाजपा महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा सौ. चित्राताई वाघ यांच्या हस्ते खामगाव येथे भाजपा महिला मोर्चाच्या मेळाव्यात सौ. सिंधुमतीताई राखोंडे यांची भाजपा महिला मोर्चा शहर सरचिटणीसपदी नियुक्ती घोषित करण्यात आली. ही नियुक्ती भाजपा बुलढाणा जिल्हाध्यक्ष मा. आमदार श्री आकाशदादा फूंडकर, भाजपा प्रदेश सोशल मीडिया संयोजक सागरदादा फूंडकर व आपल्या सर्वांचे लाडके नेते तथा माजी आमदार श्री चैनसुखजी संचेती यांच्या मार्गदर्शनात व सामाजिक कार्यकर्ते तथा शहराध्यक्ष श्री श्यामभाऊ राखोंडे आणि ज्येष्ठ समाजसेविका तथा मा. शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा यांच्या प्रयत्नांनी करण्यात आली.
या नियुक्तीच्या निमित्ताने नांदुरा शहर भाजपा कार्यालयात नवनियुक्त सरचिटणीस *सौ. सिंधुमतीताई राखोंडे यांचा सत्कार* करण्यात येऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी नांदुरा शहरातील महिलांना *ई-श्रम कार्डचे वाटप करण्यात येऊन त्याबाबत योग्य मार्गदर्शन* करण्यात आले._
यावेळी सत्काराला उत्तर देताना आपण मा. शहराध्यक्षा सौ. सारिकाताई डागा व इतर सर्व भाजपा महिला पदाधिकारी यांच्या समवेत महिलांचे विविध सामाजिक प्रश्न, पक्ष विस्तार तसेच विविध सामाजिक व सेवाभावी कार्यांबाबत अनेक आव्हाने पेलणार असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष विस्तार हे प्राथमिक कार्य असून पक्ष घराघरांपर्यन्त पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून भाजपाने दिलेली संधी सार्थकी लावू असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी बेटी बचाव बेटी पढाव शहर संयोजिका सौ. ज्योतीताई तांदळे,भाजपा बुलढाणा जिल्हा उपाध्यक्षा सौ. लताताई ठोंबरे,जिल्हा सचिव अनिताताई ब्रह्मानंद चौधरी, भारतीय जनता पार्टी महिला आघाडी शहर उपाध्यक्षा शोभाताई देशमुख, सौ. जयश्रीताई पिंपरे, सौ. उषाताई क्षित्रे, सौ. सविताताई म्हसणे, सौ. हर्षाताई इंगळे, सौ. संगीताताई राठी, पूजा बिहाडे, विजया राऊत, सौ. सांकळे ताई* यांच्याबरोबरच सर्व भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते, जेष्ठ नागरिक तसेच त्यांच्या असंख्य महिला कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व भावी वाटचालीस शुभेच्छा प्रदान केल्या.
Users Today : 37