पाडळी ते मढ ०८ कि.मीची नवीन लिंक लाईन होणार

Khozmaster
2 Min Read
आमदार धर्मवीर श्री संजुभाऊ गायकवाड यांनी दिले निर्देश
 बुलढाणा
 तालुक्यातील पाडळी ते मढ या ०८ कि.मी मार्गावर नवीन लिंक लाईन टाकण्यात यावे असे निर्देश आमदार संजय गायकवाड यांनी दिले त्यामुळे परिसरातील शेतकरी व नागरिकात अनेक प्रकारच्या अडचणी आता दूर होण्याचे संकेत मिळत आहेत.
पाडळी येथे १३२ के.व्ही सबस्टेशन आहे. मात्र यावर नेहमीच विद्युत लोड येत असतो. परिणामी नागरिकांना नियमित विद्युत पुरवठा मिळत नाही.
या ठिकाणी असलेली विद्युत वाहिनी अतिशय जुनी असल्याने शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी विद्युत पुरवठा सुरळीत नसल्याने अनेक प्रकारच्या अडचणींना समोर जावे लागते. अशा तक्रारी शेतकऱ्यांच्या होत्या. या विषयावर आमदार संजय गायकवाड यांनी तत्काळ दखल घेऊन आज पाडळी येथील सर्विस स्टेशन येथे भेट देत शेतकऱ्यांशी संवाद साधला.
या ठिकाणी शेतकऱ्यांच्या सातत्याने येणाऱ्या तक्रारी पाहता आमदार संजय गायकवाड यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी चर्चाही केली. पाडळी ते मढ या ठिकाणी भाग एक आणि भाग दोन अशा दोन भागांमध्ये विद्युत लाईन टाकलेलीआहे. मात्र पाडळी ते मढ भाग दोन या भागामध्ये आठ किमी पर्यंतची नवीन लिंक लाईन ची आवश्यकता असल्याचे यावेळी निर्देशनास आले त्यामुळे आमदार संजय गायकवाड यांनी संबंधित अधिकाऱ्यास निर्देश देऊन हे काम लवकरात लवकर पार पाडण्याच्या सूचना केल्या या परिसरात नवीन लिंक लाईन टाकण्यात आल्याने या भागातील पाडळी, गिरडा, चौथा, मेरखेड , अटकळ, ईजलापुर, गोंधनखेड, मढ आदी भागात विद्युत पुरवठा सुरळीत होईल आहे आमदार संजय गायकवाड यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीचा निपटारा केल्याने शेतकऱ्यात उत्साहाचे वातावरण आहे.याप्रसंगी तालुकाप्रमुख धनंजय बारोटे महावितरणचे अभियंता जगदीश नादार,राजेंद्र गायकवाड, अनिल राजपूत, राजू राजपूत, शिवाजी डुकरे, जयेश पवार,शुभम शेळके, सुदाम केदारे,तेजराव बिल्लारी, रवी गायकवाड, रणधीर देवका,एस के राऊत, गणेश पवार, आदी मान्यवर उपस्थित होते.या ठिकाणी अनेक प्रकारच्या अडचणीस नागरिकांना समोर जावे लागते शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी विद्युत पुरवठा…..!
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *