भूमी अभिलेख विभागाच्या भूकरमापक तथा लिपिक पदाची  परीक्षा 28 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत होणार

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी प्रा. भरत चव्हाण नंदुरबार
 भूमी अभिलेख विभागातील गट ‘क’ पदसमूह (भूकरमापक तथा लिपिक) संवर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्यात येणार आहेत. या पदाची परीक्षा 28,29 आणि 30 नोव्हेंबर 2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर घेण्यात येईल,अशी माहिती नाशिक विभागाचे भूमि अभिलेख उपसंचालक महेशकुमार शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
सेवाप्रवेश नियमांनुसार जाहिरातीत नमूद केलेल्या अर्हते ऐवजी इतर अर्हतेबाबत प्रमाणपत्र अपलोड केलेली आहेत, अशा उमेदवारांना अपात्र ठरवून संपूर्ण प्रक्रियेअंती पात्र ठरलेल्या उमेदवारांची ऑनलाईन परीक्षा (कॉम्पुटर बेस्ट टेस्ट ) 28 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर,2022 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर हपरीक्षेचे विभागनिहाय वेळापत्रक व उमेदवारांचे परीक्षेचे प्रवेशपत्राबाबतची माहिती भूमी अभिलेख विभागाचे अधिकृत संकेतस्थळ
http://mahabhumi.gov.in यावर उपलब्ध आहे. संबंधित उमेदवारांने संकेतस्थळावरील सूचनांनुसार प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेवून प्रवेशपत्रावर नमूद परीक्षा केंद्रावर उमेदवारांने दिलेल्या वेळेत परीक्षेस उपस्थित राहावे, असे आवाहन श्री.शिंदे यांनी केले आहे.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *