श्रध्दा ..
प्रेमावर कशी श्रध्दा
श्रद्धेचे केले तुकडे
का असा बसे ठसा
काय केले रे वाकडे
घरदार सगळे सोडे
आली ती तुझ्याकडे
हृदयात प्रेम तिच्या
मनात तुझ्या माकडे
आईवडील तळमळे
रे उदासवाणे तिकडे
तयारी अंतयात्रेस्तव
जोरा चालली इकडे
फ्रीज मधील तुकडे
थंडी वाजे कुडकुडे
डोके त्याचे थंड परी
भावनाशून्य ते दगडे
निमीत्ताने शिक जरा
जाणा अनुभवी धडे
प्रेमात नसावे अंधत्व
पहा रे मायबापाकडे
अतिरेकी सूट मिळते
स्वैराचारा अलिकडे
घिरट्या घाले गिधाडे
दिसे ना ती पलिकडे
– हेमंत मुसरीफ पुणे.
९७३०३०६९९६.
Users Today : 36