स्व.आई,वडिलांच्या स्मृतीचा लोकसोहळा पाहून भारावले – निमा अरोरा

Khozmaster
1 Min Read
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
नोकरीतील छोट्या पदावर राहूनही आपल्या चांगल्या गुणांमुळे आपण लोकांची मने जिंकू शकतो.लहान पदालाही प्रतिष्ठा प्राप्त करून देऊ शकतो.महसूल विभागात अनेक वर्षे चालक पदावर राहून रतनलाल तायडे यांनी सातत्याने आई,वडिलांच्या स्मृतीचे भान ठेवले आणि त्याचा समाजोपयोगी काम करून लोकसोहळा केला,हे पाहून मी भारावले,आणी सेवानिवृत्त झाल्यावर नॅचरोपॅथी चे डाॅक्टर झाले ही अभिमानास्पद बाब असे विचार जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी व्यक्त केले.
पणज भोईराज स्व.किसनराव तायडे यांचे स्मृतीदिनानिमित्त २०२३ च्या दिनदर्शिका लोकार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले जिल्हाधिकारी निमा अरोरा हे होत्या.तर यावेळी उपविभागीय अधिकारी विश्वनाथ घुगे,तहसीलदार राजेश गुरव,उद्दोजक विजय दातीर,कविवर्य विठ्ठल कुलट, डाॅ.दाते,डाॅ.सुहास कुलट,माजी सरपंच सविता तायडे,रुक्मिणी तायडे,अश्वीणी मयूर तायडे सदस्या सुवर्णा संजय देशमुख,सिंधूताई जायले,रुपाली संजय अस्वार,प्रदीप ठाकुर,ओम शेंडे,रामदास तायडे, विलास राऊत,विवेक टेकाडे,मुकेश गुप्ता,गजानन नेमाडे,अनील रोकडे,दिनेश वि.बोचे या मान्यवरांची उपस्थिती होती.
तर प्रास्तवीक प्रतिभा साहित्य संघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठल कुलट यांनी केले.तर संचालन डाॅ. अभिषेक गावंडे यांनी तर आभार प्रदर्शन निर्माता डाॅ. रतनलाल तायडे भोई यांनी केले.कार्यक्रमास गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *