माझा एक दिवस माझ्या बाळीराजासाठी कार्यक्रमाअंतर्गत कृषि विभागामार्फत धनवट येथे मार्गदर्शन

KHOZ MASTER
1 Min Read
सोयगाव प्रतिनिधी गोकुलसिंग राजपूत
माझा एक दिवस माझ्या बळिराजासाठी या कार्यक्रमाअंतर्गत सोयगांव तालुक्यातील धनवट येथे जाऊन सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी गावकारींना मार्गदर्शन केले तसेच त्यांच्या विविध समस्या जाऊन घेतल्या. शेतकरी वर्गाशी संवाद साधताना विवध पिकातील किड व रोग नियंत्रण, खतांचे व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, पिक विमा, वनराई बंधारे,महाडीबीटी योजनेची माहिती, शेतकरी गट माहिती,प्रधानमंत्री किसान सन्मान योजना तसेच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची माहिती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच आजच्या कार्यक्रमात पौष्टिक तृणधान्य वर्षनिमित्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानअंतर्गत ज्वारी पिकाविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी गावातील प्रगतिशील शेतकरी यांनी अडचणी मांडल्या यात प्रामुख्याने शेतकरी वर्गास दिवसा वीज मिळावी, तसेच सौर ऊर्जा प्रत्येकाला मिळावी आदी मागण्या मांडण्यात आल्या. आजच्या कार्यक्रमास प्रामुख्याने तालुका कृषि अधिकारी एस. जी. वाघ, कृषि पर्यवेक्षक हेमंत देशमुख, अतुल पाटील, कृषि सहाय्यक आरती बावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच आजच्या कार्यक्रमांस गावाचे सरपंच, उपसरपंच,जि. प.सदस्य गोपीचंद जाधव,तंटामुक्ती अध्यक्ष अशोक पाटील, ग्रामपंचायत सदस्य उमरखा पठाण ,नाजीम पठाण तसेच गावातील प्रगतशील शेतकरी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *