संभाजीनगर प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत
छत्रपती संभाजीनगर सुत गिरणी चौकातील संपर्क कार्यालय येथे महाराष्ट्र राज्याचे रोहयो व फलोत्पादन तथा पालकमंत्री मा. श्री संदिपानजी भुमरे साहेब हे आठवड्यातून सोमवार हा एक दिवस पुर्णवेळ जिल्हा व जिल्ह्या बाहेरील जनतेच्या अडिअडचणी सोडवण्यासाठी देतात. तेव्हा वरील भेटी दरम्यान अंध-अपंग-विकलांग व्यक्तीं संदर्भात मा. भुमरे साहेबांचे दिसून आलेले एक आदर्शवत दृश्य सविस्तर माहिती अशी कि दि.१४ नोव्हेंबर २०२२ वार सोमवार रोजी छ. संभाजीनगर येथील संपर्क कार्यालय येथे मा. मंत्री महोदय जनतेच्या समस्या सोडवण्याचे काम करत होते. सोमवार हा दिवस भेटीचा असल्यामुळे पालकंत्री साहेबांचे मुख्य चेंबर त्यासमोरील हॉल आणि हॉल बाहेरील परिसर भेटीसाठी महिला व पुरूषांनी तुडुंब भरलेला होता. आणि अशातच दोन्ही हात आणि पायांनी विकलांग असलेले गोविंद वाघ नावाचे ग्रहस्थ साहेबांनी कॕमे-यातून हेरले. त्यांना बसण्याकरीता सुध्दा जागा शिल्लक नसल्याचे साहेबांच्या लक्षात येताच जवळ उभ्या असलेल्या अंगरक्षकाला त्यांना आपल्या जवळ घेऊन येण्याचे कळविले. त्यांना आत घेऊन जात असताना तिथे प्रत्यक्षद्रशी उभे असलेले शेकडो लोक पाहतच राहिले. एवढेच नाहीतर अंगरक्षक यांना सांगून विकलांक व्यक्तीला समोरच्या खुर्चीवर न बसवता; आपल्या शेजारी दुसरी खुर्ची ठेऊन गोविंद वाघ यांच्या समस्या मागण्या जाणून घेतल्या. व त्या पुर्ण करण्याचे आश्वासनही दिले. तसेच गोविंद वाघ हे साहेबांचे जवळचेच निष्ठावान कार्यकर्त्यां पैकी एक असल्याचे समजते. साहेबांनी वाघ या विकलांग व्यक्तीच्या अडिअडचणी आई जसे आपल्या बाळाला जवळ घेऊन विचारणा करते अगदी तश्याच प्रकारे जाणून घेतल्या तेव्हा साहेबांनी कामा संदर्भात विश्वासाचा शब्द देताच वाघ यांच्या चेहऱ्यावरचे हास्य पाहून बघणा-यांच्याही चेह-यावर हास्य उमटले तेव्हा प्रतेक जन म्हणत होते कि, इतके सामान्य, मनमिळावू, आत्मियतेने विचारणा करणारे, संदिपान भुमरे साहेबांसारखे कॕबिनेट मंत्री तसेच छ. संभाजीनगरला पालकमंत्री लाभले हेच आम्हा जनतेचे भाग्य असे उपस्थित जनसमुदाय मधुन चर्चेतून ऐकायला मिळत होते.
Users Today : 14