योगेश नागोलकार पातुर बाळापूर
मार्गावर येत असलेल्या बाभुळगाव जवळ आज दुपारी 2 वाजताच्या दरम्यान पोलीसांचे वाहन पलटी झाले असून यात चार पोलीस कर्मचारी व तीन होमगार्ड असे एकूण सात जखमी झाल्याची घटना घडली आहे.राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा बंदोबस्त आटोपून पातुर कडे जात असताना हा अपघात घडला.सलग दोन दिवसांपासून अकोला जिल्ह्याचे पोलीस 24 तास राहुल गांधी यांच्या भारत जोडी यात्रेच्या बंदोबस्तात व्यस्त होते ही यात्रा पातुर वाडेगाव बाळापुर मार्गे शेगाव रवाना झाली सलग दोन दिवस अकोला जिल्ह्याची पोलीस यंत्रणा व होमगार्ड बंदोबस्तात व्यस्त असल्याने आज दुपारी अकोला जिल्ह्यातून ही यात्रा बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव मध्ये दाखल झाली आणि अकोला पोलिसांचा ताण कमी झाला. आपला चोख बंदोबस्त आटपून सर्व पोलीस कर्मचारी आप आपल्या पोलीस स्टेशन येथे रवाना होत असताना पोलिसांच्या वाहनाला अपघात झाला. दुपारी बंदोबस्त आटपून अकोला हेडक्वार्टर मोटरचे वाहन एम एस.30 एच 506 या क्रमांकाच्या गाडीने पातुर कडे जात असताना सदर गाडीचे टायर फुटले असता गाडीचे चाकाला होमगार्ड संजय शिरसाट यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी पलटी झाली. या अपघातात पोलीस कर्मचारी सुनील सुखदेव वाघ, अश्वजीत सदार, उमेश सानप, कुंदन इंगळे, तसेच होमगार्ड गजानन घेघाटे, मोहम्मद यासिर, व होमगार्ड वाहन चालक संजय शिरसाट,हे जखमी झाले. अपघात एवढा भयंकर होता की या गाडीने तीन पलटया खाऊन गाडी रस्त्याच्या कडेला पडली सुदैवाने यात कोणतीच जीवीत हानी झाली नसून जखमीवर बाबुळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Users Today : 47