सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली एआयएमआयएम पक्षातील अंतर्गत कलहामुळे वरिष्ठ व अनुभवी कार्यकर्ते एका मागे एक असे पक्ष सोडून जात आहे.

Khozmaster
2 Min Read
चिखली प्रतिनिधी
सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब यांच्या आदेशाने व प्रदेशाध्यक्ष सागर डबरासे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली चिखली एआयएमआयएम पक्षातील अंतर्गत कलहामुळे वरिष्ठ व अनुभवी कार्यकर्ते एका मागे एक असे पक्ष सोडून जात आहे.चिखली शहर उपाध्यक्ष मोहम्मद सोहेल यांनी एआयएमआयएम पक्षाला सोडचिठ्ठी दिल्याने खूप मोठे खिंडार पडले असुन हा एआयएमआयएम पक्षाला खूप मोठा झटका समजल्या जातो.
बुलडाणा जिल्ह्यातील प्रखर नेतृत्व पाहून भाई विजयकांत गवई यांच्यासोबत जिल्ह्यातील युवा वर्ग तसेच विचारवंत प्रौढवर्गाचा सुद्धा कौल दिसत आहे त्यांनी रिपब्लिकन सेनेचे कार्य हाती घेतल्यापासून इतरही राजकीय पक्षांचे कार्यकर्ते सुद्धा संपर्काच्या तयारी दिसतात रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून गाव तेथे शाखा शेतकऱ्यांचे प्रश्न भूमीहीनाचे प्रश्न अपंगाचे प्रश्न शालेय विद्यार्थ्यांचे प्रश्न राशन धारकाचे प्रश्न असे कितीतरी कामे रोजचे रोज करून जन सामान्यात आपुलकी निर्माण होऊन त्या धर्तीवर हा बहुसंख्य वर्ग रिपब्लिकन सेनेकडे वळताना दिसत आहे भविष्यातील निवडणुका पाहाता व पक्षाचा धबधबा पाहता अनेकांच्या भोवया उंचावल्या आहेत. जिल्हा उपाध्यक्ष ब्रम्हाभाउ साळवे, जिल्हा महासचिव सलीमभाई यांच्या हस्ते मोहम्मद सोहेल मोहम्मद अलीम, चिखली तालुका उपाध्यक्ष आणि अनिल चव्हाण चिखली शहर सहसंघटक नियुक्तीपत्र देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या कार्यकर्त्यांचे सत्कार कामगार जिल्हाध्यक्ष रहेमानभाई, पेंटर संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश इंगळे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख शेख मुक्तार, चिखली शहराध्यक्ष सुनील सोळंके, युवा शहराध्यक्ष शेख मलिक, चिखली शहर उपाध्यक्ष रमेश अंभोरे, तालुका उपाध्यक्ष वसीमभाई यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाला उपस्थित विश्वनाथ भाऊ सपकाळ वाघापूर, ऋषिकेश हिवाळे, शेख जावेद, कलीम खान, सतीश पवार, दीपक तायडे, सौरभ बावस्कर, शुभम जाधव, संकेत जाधव, शेख गुड्डू, तौफिक शेख, सुनील जाधव, चेतन आराख, निशा आराख, सुशील जाधव, शेख फैजान, शैलेश चव्हाण, शेख आतिक मोठ्या संख्येने कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
0 9 4 6 8 0
Users Today : 30
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *