प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करुन पिडीत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात दिले.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध विभागाकडून एका आरोपीतास ठोकल्या बेडया..
अधिक माहिती अशी कि ,सकऱ्या गुजला पावरा (वय-58) रा. भमाने ता. धडगांव जि. नंदुरबार यांच्या (17 वर्षीय) अल्पवयीन मुलीला झापीचा मांजरी पाडा येथील राहणारा पुणाश्या आपसिंग चौधरी (नाईक) याने दिनांक 14 सप्टेंबर 2020 रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पळवून नेले. म्हणून म्हसावद पोलीस ठाणे येथे पुणाशा आपसिंग चौधरी (नाईक) रा. झापीचा मांजरी पाडा ता. धडगांव याचेविरुध्द् म्हसावद पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 241/2020 भा.द.वि. कलम 363 प्रमाणे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.सदर गुन्ह्याचा प्रारंभीचा तपास म्हसावद पोलीस ठाणे यांचेकडून करण्यात येत होता, परंतु गुन्हा दाखल होऊन बराच कालावधी झाल्यानंतर देखील संशयीत आरोपी व अल्पवयीन मुलगी मिळुन येत नव्हती, म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदरचा गुन्हा स्थानिक गुन्हे शाखा अंतर्गत अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाकडे सोपवून संशयीत आरोपीतास तात्काळ ताब्यात घेऊन गुन्हा उघडकीस आणणे बाबत सूचना दिल्या होत्या.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा.पोलीस निरीक्षक नयना देवरे व त्यांच्या पथकाने स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा बारकाईने अभ्यास करुन संशयीत आरोपी व गुन्ह्यातील अपहरण झालेली अल्पवयीन मुलगी यांचे बाबत माहिती काढण्यासाठी एक पथक तयार केले.पथकाने संशयीत आरोपीचे गाव झापीचा मांजरी पाडा व गुन्ह्यातील अपहरण झालेली अल्पवयीन पिडीत मुलीचे गाव भमाने ता. धडगांव येथे जावून माहिती घेतली असता आरोपीताने अल्पवयीन मुलीला गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यामधील पछाई येथे पळवून घेवून गेलेला असल्याबाबत खात्रीशिर माहिती मिळाली. म्हणून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्ष येथील सहा.पोलीस निरीक्षक नयना देवरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अमंलदारांचे एक पथक तयार करुन तात्काळ पछाई जि. भावनगर येथे रवाना केले. पथकाने संशयीत आरोपी याची संपूर्ण माहिती प्राप्प केली असता तो पछाई गावात एका शेतात मजुर म्हणून काम करीत असल्याचे समजले.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने सुरुवातीस पछाई ता. वल्लभीपूर जि. भावनगर येथे जावून संशयीत आरोपी ज्या शेतात मजुर म्हणून काम करीत होता, त्याबाबत माहिती काढली. तसेच त्याच्या घराच्या आजु-बाजूला वेषांतर करुन अत्यंत योजनापूर्वक सापळा रचला, परंतु संशयीत आरोपीतास पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला परंतु अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाने त्यास शिताफीने व गुन्ह्यातील अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतले. संशयीत आरोपी पुणाश्या आपसिंग चौधरी (नाईक) रा. झापीचा मांजरी पाडा, ता. धडगांव जि. नंदुरबार पथकाने आरोपीताच्या घरातून अपहरण झालेल्या अल्पवयीन मुलीची सुटका करुन पिडीत मुलीला तिच्या पालकांच्या ताब्यात देवून आरोपीतास गुन्ह्याच्या पुढील तपासकामी म्हसावद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलेले आहे.
अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी अभिनंदन करुन पथकास बक्षीस जाहीर केले आहे. तसेच अपहरण झालेल्या मुलीच्या वडिलांनी त्यांच्या मुलीची सुखरुप सुटका केल्याबद्दल नंदुरबार पोलीसांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहे.
सदर ची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कक्षाच्या पथकाचे सहा.पोलीस निरीक्षक नयना देवरे, म्हसावद पोलीस ठाण्याचे सहा.पोलीस उप निरीक्षक प्रदिपसिंग राजपुत, पोलीस हवालदार विनोद जाधव, महिला पो. नाईक अरुणा मावची, तुषार पाटील यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 37