अकोट प्रतिनिधी विशाल गवई
रचना दिलीप तेलगोटे या मुलीची बी एस एफ मध्ये निवड झाल्याबद्दल राष्ट्रीय अपंग विकास महासंघाच्या वतीने रचना तेलगोटे हिचा सत्कार घेण्यात आला व पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा देण्यातआल्या.
रचना तेलगोटे हे गरीब परिवारातली मुलगी असून ती आता देश सेवेकरिता सज्ज झाली असल्याने रचनाचा ठिकठिकाणी सत्कार होत आहे अकोट तालुक्यातच नव्हे तर अकोल्या जिल्ह्यात चर्चा होत असल्याने दिव्यांग बांधवांनी तिचा सत्कार केला.3 डिसेंबर जागतिक दिन उत्सवात साजरा करण्यासाठी मिटींगचे आयोजीत करण्यात आली होते या मीटिंगमध्ये दिव्यांगांच्या अनेक समस्या सोडविण्यासाठी दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय हवं यासाठी किती आंदोलन मोर्चे निवेदन देऊन राष्ट्रीय अपंग विकास महासंघाने पंचवीस वर्षापासून संघर्ष करत आहे आता शिंदे सरकारने स्वतंत्र मंत्रालयची घोषणा करून दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्याचे सरकारच्या मनात भावना जागृत झाल्याच्या दिसून येत आहे आत्तापर्यंत एवढे आंदोलन झाले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस व अकोला जिल्हा माजी पालकमंत्री बच्चु कडू दिव्यांगांचे अडचणी व समस्या लगेच मार्गी लावणारे यांनी दिव्यांगांच्या प्रश्न मार्गी लागावे यासाठी दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय होणार असल्याचे घोषणा केल्याने यावर्षी ३ डिसेंबर जागतिक दिन हा उत्सवात साजरा होणार आहे.कारण की हा ऊसो सरकारपासून सुरुवात होत असल्याने दिव्यांगांमध्ये ऊर्जा तयार झाली आहे या मीटिंगमध्ये सर्व दिव्यांग बांधवांनी सरकारचे आभार व्यक्त करताना दिव्यांगांच्या अडचणी प्रमुख मार्गदर्शका समोर मांडल्या या मिटींगला प्रमुख पाहुणे मा राज्य संचालक गणेश वाकोडे यांनी आपल्या भाषणातून सरकारने चांगले काम केले असे दिव्यांगांना सांगितले पण त्याची अंमलबजावणी होणार की नाही हा प्रश्न दिव्यांगांच्या मनात उमगला असल्याचे दिसून आले कारण की अकोटचे आमदार हे किती वर्षापासून आमदार असून एकही वर्षी आमदार निधीतून दिव्यांगावर खर्च करण्यात आला नाही आमदार निधीतून दिव्यागावर खर्च करा असा शासन परिपत्रक असूनही आमदार निधीचा कुठही खर्च होतानां दिसून येत नाही असे दिव्यांगांनी या झालेल्या मीटिंगमध्ये प्रश्न मांडले तरी यावर्षी आमदाराने आपल्या निधीतून खर्च करून 3 डिसेंबर जागतिक दिन साजरा करा असे मीटिंगमध्ये सर्वांनी आपले विचार मांडले या मीटिंग चे आयोजन अकोट तालुका अध्यक्ष धीरज पाटील हिंगणकर तालुका उपाध्यक्ष अनिल राऊत महिला आघाडी तालुका अध्यक्ष वंदनाताई इंगळे अकोट शहराध्यक्ष जब्बारशहा महिला आघाडी अकोट शहराध्यक्ष ललिता नाथे अकोलखेड सर्कल अध्यक्ष घनश्याम जुनघरे पणज सर्कल अध्यक्ष अरुणा लाजुरकर संतोष गायकवाड राजू शेळके बसंता गवई भीमराव तायडे नागनाथ नथजोगी सोनाली नाथजोगी तसेच यावेळी अकोट तालुक्यातील दिव्यांग बांधवांची चांगल्या संख्येने उपस्थिती लाभली होती.
Users Today : 11