प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
मागील काही दिवसांपासुन नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार शहर, उपनगर पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रीक मोटर व इतर चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याने सामान्य नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. म्हणून पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी मासिक गुन्हे बैठकीत अशा पध्द्तीच्या गुन्ह्यांचा गुन्हे आढावा घेतला असता, नंदुरबार जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांना अशा प्रकारचे चोरीचे गुन्हे दाखल असुन ते गुन्हे अद्यापही उघडकिस आलेले नव्हते. पोलीसांसमोर देखील चोरट्यांना जेरबंद करुन घडलेले गुन्हे उघडकिस आणणेे हे मोठे आवाहन होते. त्याअनुषंगाने चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने तपास करुन गुन्ह्यातील सक्रीय गुन्हेगारांवर कारवाई करणे बाबत पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी निर्देश गुन्हे बैठकीत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकाऱ्यांना दिले.
वरिष्ठांच्या वरील सुचना व मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी नंदुरबार जिल्ह्यात झालेल्या चोरीच्या पध्द्तीचा अभ्यास करुन वारंवार चोरी होणारे ठिकाण, चोरीची पध्द्त यांची इत्थंभूत माहिती घेवुन रेकॉर्ड वरील, मालमत्तेविरुध्द्च्या गुन्ह्यातील जेल मधुन सुटुन आलेल्या गुन्हेगारांवर पाळत ठेवुन होते. तसेच आपले बातमीदारांमार्फत देखील माहिती काढत होते.
त्यातच दि. 16 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नंदुरबार शहरातील रमेश पुरुषोत्तम पाटील
(वय- 60) प्लॉट नं- 141, गिरीविहार सोसायटी नंदुरबार यांचे घराबाहेर वापरासाठी नगरपनालिकेच्या नळाला कनेक्शन केलेली 5000/- रु कि. पाण्याची मोटार कोणी तरी अज्ञात आरोपीतांनी चोरून नेली म्हणून उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 351/2022 भांदवि कलम 379 प्रमाणे अज्ञात आरोपीताविरुध्द् चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. दिनांक 16 नोव्हेंबर रोजी उपनगर पोलीस ठाणे हद्दीत इलेक्ट्रीक मोटर चोरीची घटना घडल्यामुळे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी गांभीर्याने दखल घेतली. तसेच सदरची घटना म्हणजे पोलीसांना चोरट्यांकडून एक प्रकारे जणू आव्हानच होते.
पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, नंदुरबार शहर व उपनगर परीसरात इलेक्ट्रीक मोटर चोरी करणारा हा नंदुरबार शहरातील सराईत गुन्हेगार असून तो आज मण्यार मोहल्ला येथे चोरीच्या इलेक्ट्रीक मोटार विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सदरची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर यांना सांगून त्यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे तात्काळ एक पथक तयार करुन बातमीची खात्री करून तात्काळ आरोपींना ताब्यात घेवून कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले.
पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नंदुरबार शहरातील मण्यार मोहल्ला परिसरात सापळा लावला. दिनांक 18 नोव्हेंबर रोजी 12.00 वा. सुमारास दोन संशयीत इसम हातात हातात पांढऱ्या रंगाच्या प्लास्टीकच्या गोण्या व सोबत एक लहान मुलांची सायकल घेवून येतांना दिसले. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्यांच्या दिशने जात असतांना दोन्ही संशयीत इसमांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला पाहून पळण्याचा प्रयत्न केला परंतु पथकाने दोन्ही संशयीतांचा पाठलाग करुन शिताफीने त्यांना ताब्यात घेतले. चंद्रशेखर नथ्थु मेश्राम (वय 32 ) रा. चिचपाडा भिलाटी, नंदुरबार, शाहरुख खान अस्लम खान पठाण (वय 26) रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार असे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही आरोपीतांची कायदेशीर प्रक्रिया करुन तपासणी केली असता त्यांच्या ताब्यात 25 हजार रुपये किमतीचे 05 इलेक्ट्रीक मोटर व 5000 रु.कि.ची एक लहान मुलांची सायकल मिळून आले त्यांना इलेक्ट्रीक मोटर व सायकल बाबत विचारपुस केली असता त्यांनी सदरचे इलेक्ट्रीक मोटर मागील काही दिवसांमध्ये नंदुरबार शहरातील विविध भागातून व सायकल नंदुरबार शहरातील ML Town परिसरातून चोरी केल्याचे सांगितले. मिळून आलेले इलेक्ट्रीक मोटर बाबत नंदुरबार शहर व उपनगर पोलीस ठाण्याचा अभिलेख पाहिले असता इलेक्ट्रीक चोरी बाबत उपनगर पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 351/2022 भा.द.वि. कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्यामुळे सदर इलेक्ट्रीक मोटर व सायकल कायदेशीर प्रक्रिया करुन जप्त करण्यात आले आहेत तसेच तिन्ही आरोपीतांना पुढील तपासकामी उपनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून इलेक्ट्रीक मोटर व सायकल चोरी बाबत गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीतांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे असे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी सांगितले.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार महेंद्र नगराळे, पोलीस नाईक राकेश मोरे, दादाभाई मासुळ, रमेश साळुंखे, पोलीस शिपाई राजेंद्र काटके, अभय राजपुत, आनंदा मराठे यांच्या पथकाने केली आहे.
Users Today : 37