हेल्मेटचा वापर करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल

Khozmaster
3 Min Read
हेल्मेटचा वापर करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेटसह मोटार सायकल रॅली….
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
याबाबत अधिक माहिती अशी कि, पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी घेतलेल्या मासिक गुन्हे आढावा बैठकीत असे निदर्शनास आले की, राष्ट्रीय, राज्य व इतर रस्ते अपघातांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली असुन रस्ते अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येमध्ये देखील वाढ होत आहे. रस्ते अपघतांमध्ये मृत्यु होणाऱ्यांमध्ये दुचाकीस्वारांची सख्या जास्त असल्यामुळे रस्ते अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी नंदुरबार जिल्हा पोलीस दला तर्फे नागरिकांनी दुचाकी वाहनाचा वापर करतांना हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृती रॅलीचे आयोजन आज दिनांक 18 नोव्हेंबर रोजी नंदुरबार शहरातील नेहरु पुतळा येथे करण्यात आले होते. रस्ते अपघतांमध्ये होणारी वाढ कमी करणे हा मोटार सायकल रॅलीमागील मुख्य उद्देश होता.जिल्हा पोलीस दलाच्या वतीने पहिल्यांदाच नागरिकांनी हेल्मेटचा वापर करण्यासाठी जनजागृतीसाठी मोटार सायकल रॅलीचे आयोजन केल्यामुळे ती पाहण्यासाठी नंदुरबार शहराच्या रस्त्यावर लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. सदर मोटार सायकल रॅलीला नंदुरबार शहरातील नागरिकांनीही तेवढ्याच उत्साहाने प्रतिसाद देत पोलीस अधिकारी व अमंलदार यांच्या मोटार सायकल रॅलीवर फुलांचा वर्षाव करुन रॅलीचा उत्साह वाढविला.
सदरची रॅली ही नंदुरबार शहरातील नेहरु पुतळा येथुन निघून नगरपालिका चौक, डॉ. अंधारे चौक, मोठा मारुती, देसाई पेट्रोल पंप, दो-शहा तकिया, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जळका बाजार, सोनार खुंट, महाराष्ट्र व्यायाम शाळा, म. गांधी पुतळा, उड्डाणपुल मार्गे गिरीविहार गेट, सी.बी. पेट्रोल पंप व पुन्हा नेहरु पुतळा या मार्गाने रॅलीने मार्गक्रमण केले व नेहरु पुतळा येथे सदर रॅलीचे समारोप झाला. हेल्मेट परिधान केलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या रॅलीने नंदुरबारवासीयांचे लक्ष वेधून घेतलेे.
सदरची मोटार सायकल रॅली चालू असतांना आजुबाजूला उपस्थित असलेले लोक त्यांच्या मोबाईल मध्ये मोटार सायकल रॅलीचे चित्रीकरण करत होते तसेच टाळ्या वाजवून मोटार सायकल रॅलीचे मनोबल वाढवत होते.जिल्हा पोलीस दलात सद्या हेल्मेट सक्ती अनिवार्य केल्यामुळे सर्व पोलीस सद्या हेल्मेट परिधान करीत आहेत. तसेच मोटार सायकल रॅलीतील पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी हेल्मेट परिधान करून आपल्या जीवनात दुचाकी चालवितांना प्रत्येक नागरिकाला हेल्मेटचे महत्व लक्षात आणून दिले. तसेच प्रत्येक नागरिकाने आपल्या कुटुंबाच्या भवितव्यासाठी हेल्मेट वापरावे असे आवाहन देखील.
नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पी.आर.पाटील यांनी केले.सदर मोटार सायकल रॅलीच्या वेळी पोलीस अधीक्षक  पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे,  उप विभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांचेसह नंदुरबार जिल्ह्यातील इतर अधिकारी व नंदुरबार जिल्हा पोलीस दलातील सुमारे 20 पोलीस अधिकारी व 50 पोलीस अमंलदार हे हेल्मेटसह रॅलीला उपस्थित होते.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *