फसवणूकीच्या गुन्ह्यातील 04 वर्षांपासुन फरार आरोपीस : स्थानिक गुन्हे शाख़ेने राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या… 

Khozmaster
4 Min Read
प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार
फसवणूकीच्या गुन्ह्यातील 04 वर्षांपासुन फरार आरोपीस  स्थानिक गुन्हे शाख़ेने राजस्थान राज्यात ठोकल्या बेड्या.
सविस्तर वृत्त असे कि,
नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.बी.जी. शेखर पाटील यांनी नाशिक परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये विविध गुन्ह्यांमध्ये गुन्हा घडल्या पासून आज पावेतो फरार, पाहिजे किंवा फेर अटक आरोपीतांना अटक करणे बाबत संपूर्ण नाशिक परिक्षेत्रात विशेष मोहीम राबविणे बाबत आदेशीत केले होते. त्याअनुषंगाने पोलीस अधीक्षक  पी.आर. पाटील यांनी नंदुरबार जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखे मधील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार यांचे स्वतंत्र पथक स्थापन करुन नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या सर्व पोलीस ठाण्यांच्या अभिलेखावरील जास्तीत जास्त फरार, पाहीजे आरोपी व फेर अटक आरोपी अटक करणे बाबत सुचना दिल्या होत्या.ऑगस्ट  दरम्यान मनोज मनमोहनदास बैजल रा. जयपुर वगैरे 05 यांनी नंदुरबार शहरातील हॉटेल हिरा एक्झीकेटीव्ह मध्ये वेगवेगळ्या नावाने रुम बुक करुन त्यात वास्तव्य करुन हॉटेलच्या रुमचे बिल न देता हॉटेल मधील लॅपटॉप व इतर साहित्य चोरुन नेले, म्हणून नंदुरबार शहर पोलीस ठाण येथे गु.र.नं. 273/2019 भा.द.वि. कलम 420,380,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता, परंतु गुन्हा घडल्यापासुन मनोज मनमोहनदास बैजल रा. जयपुर व त्याचे इतर साथिदार फरार होते.
सदर गुन्ह्यातील आरोपी मनोज मनमोहनदास बैजल हा राजस्थान राज्यातील जयपुर शहरातील मानसरोवर परिसरात राहात असल्याची गुप्त बातमी पोलीस निरीक्षक  किरणकुमार खेडकर यांना मिळाली होती.
पोलीस अधीक्षक  पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांचे मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक किरणकुमार खेडकर यांनी सदर बातमीची खात्री करुन पाहिजे आरोपी अटक करणे कामी स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तात्काळ राजस्थान राज्यातील जयपुर येथे रवाना केले.स्थानिक गुन्हे शाख़ेचे पथकाने राजस्थान राज्यातील जयपुर शहर गाठून तेथे पाहिजे आरोपी  मनोज बैजल याचा शोध घेण्यास सुरुवात केली, परंतु आरोपी हा अत्यंत चालाख असुन पोलीसांना वेळोवेळी गुंगारा देण्यात यशस्वी झाला होता. तो सहज कोठे बाहेर येत नाहीत व आपले अस्तित्व लपवून वेषांतर करुन फिरत होता. तसेच आरोपीताचा फोटो किंवा मोबाईल नंबर देखील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडे नव्हता, त्यामुळे त्यास ओळखणे कठीण झाले होते.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जयपुर सारख्या अनोळखी शहरामध्ये सतत तीन दिवस मुक्काम करुन आरोपीता बाबत इत्थंभूत माहिती काढण्यात पथकाला यश मिळाले व नमुद आरोपी हा जयपुर शहरातील जनता स्टोअर्स परिसरात येत असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास निदर्शनास आल्याने पथकाने जनता स्टोअर्स परिसरात सापळा लावला. आरोपी जनता स्टोअर्स परिसरात फिरत असतांना त्यास पोलीस आल्याचा संशय आल्याने त्याने तेथुन पळ काढण्याचा प्रयत्न केला, परंतु पथकाने लावलेला सापळा मजबुत असल्याने त्यास पळुन जाता आले नाही व तो पोलीसांच्या सापळ्यात अडकला. त्यास पथकाने ताब्यात घेतलं  मनोज मनमोहनदास बैजल (वय-54 ) रा. बी-Cedar Luxuriya, Mansarovar Extension जयपुर असे सांगितल्याने त्यास ताब्यात घेवून पुढील तपासकामी नंदुरबार शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पी.आर. पाटील, अपर पोलीस अधीक्षक  निलेश तांबे, विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी  सचिन हिरे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे  निरीक्षक किरणकुमार खेडकर, पोलीस हवालदार मुकेश तावडे, पोलीस नाईक सुनिल पाडवी, पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे यांचे पथकाने केली आहे. 04 वर्षांपासून फरार असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील आरोपीस गुप्त बातमीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राजस्थान राज्यातील जयपुर शहरामध्ये सापळा लावुन ताब्यात घेतल्याने नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक  पी.आर. पाटील यांनी संपुर्ण पथकाचे विशेष अभिनंदन केले आहे.
0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *