दुखद निधन ग.भा.दगडाबाई यांचे निधन
सोयगाव तालुक्यातील सावळदबारा येथील जेष्ठ महिला ग.भा.दगडाबाई लक्ष्मणराव भिमराव कोलते यांचे आज दिनांक 20-11-2022 रोजी 5 वाजून 30 मिनिटांनी संध्याकाळी अल्पाशा आजाने निधन झाले. ग.भा. दगडाबाई लक्ष्मणराव कोलते मयते समयी 75 वष्रेच्या होत्या. त्यांच्यावर दिनांक 21-11-2022 सोमवार रोजी सकाळी 10.00 वाजता सावळदबारा येथे मोक्षधाम भूमीत अंतिम संस्कार शोकाकुल वातावरणात करण्यात आला. अंतिम संस्कार वेळी औरंगाबाद, सिल्लोड, सोयगाव, जळगाव, फर्दापूर व सावळदबारा पंचक्रोशीतील मान्यवरांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता. प्रतिष्ठित जेष्ठ महिला ग.भा.दगडाबाई लक्ष्मणराव कोलते याचां राजकीय क्षेत्रात चांगलाच दबदबा होता. ग.भा.दगडाबाई कोलते त्यांच्या पश्चात मुले, सुना,नातवंड,जावाई असा मोठा परिवार आहे.त्या जय कालंका देवी शिक्षण प्रसारक संस्था सावळदबारा चे अध्यक्ष- श्री. भाऊराव लक्ष्मणराव कोलते यांच्या मातोश्री आहेत. व प्राचार्य एन. आर. कोलते यांच्या मोठया आई आहेत. व जीवन कोलते यांच्या आजी आहेत. त्यांच्या पश्चात 84 जणांचा मोठा परिवार आहे आज त्या पोरका झाला त्यांच्या जाणाने आज कोलते परिवारावर खूप मोठं संकट कुटुंबावर कोसळले आहे.प्रतिष्ठित जेष्ठ महिला ग.भा.दगडाबाई कोलते(पाटील) याचां दशक्रियाविधी दि.२९/११/२२ मंगळवार रोजी आहे तर उत्तरकार्याचा देवदर्शनाचा नैवेद्याची दि.२/१२/२२ शुक्रवार रोजी सकाळी १० वाजता ठेवण्यात आला आहे. शोकाकुल कोलते(पाटील) परिवार व नातेवाईक मंडळी सावळदबारा, रांजणगाव व औरंगाबाद.
